Saturday, November 1, 2025
Happy Diwali

Urban Company Q2FY26 Results: आयपीओनंतर प्रथमच तिमाहीत निकालात अर्बन कंपनीचा जलवा ! मात्र निव्वळ तोटा वाढला 'या' कारणामुळे

Urban Company Q2FY26 Results: आयपीओनंतर प्रथमच तिमाहीत निकालात अर्बन कंपनीचा जलवा ! मात्र निव्वळ तोटा वाढला 'या' कारणामुळे

मोहित सोमण:  नुकत्याच आलेल्या आयपीओनंतर प्रथमच अर्बन कंपनी लिमिटेडने (Urban Company Limited) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या तिमाहीतील निकालानुसार, कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत अर्बन कंपनीचा महसूल ३७% वाढला आहे. जून तिमाहीतील ३६७.२७ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीला ३८०.०३ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, कंपनीच्या स्वतंत्र कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Standalone Revenue from Operations) तिमाही बेसिसवर २६८.६७ कोटींच्या तुलनेत २६९.६७ कोटींवर वाढ झाली आहे. कंपनीच्या एकूण खर्चात तिमाही बेसिसवर (Quarter on Quarter QoQ) २८०.१५ कोटीवरून ३५५.७२ कोटींवर वाढ झाली आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नात (Total Income) जून तिमाहीतील ३०३.८६ कोटी तुलनेत सप्टेंबर तिमाहीत ३०६.४३ कोटींवर वाढ झाली आहे. कंपनीचा तोटा तिमाही बेसिसवर जूनमधील ६.९४ कोटीवरून वाढत सप्टेंबर तिमाहीत थेट ५९.३३ कोटींवर पोहोचला आहे.

कंपनीच्या प्रति शेअर कमाईत (Earning per share EPS) जून महिन्यातील ०.१७ रूपये तुलनेत वाढत सप्टेंबर तिमाहीत ०.३३ रूपयांवर पोहोचले आहे. तथापि निव्वळ तोटा १.८२ कोटी रुपयांवरून ५९.३३ कोटी रुपयांवर पोहोचला असला तरी भारतातील ग्राहक सेवा २६२ कोटी रुपयांसह सर्वात मोठा महसूल देणारा ठरला आहे.

माहितीनुसार, गोदामातील आगीमुळे कंपनीला ९.११ कोटी रुपयांचा इन्व्हेंटरी तोटा सहन करावा लागला यापूर्वी करावा लागला होता. तरीही सौदी अरेबियातील कामकाज बंद करताना ती आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारत आहे. एकूण मालमत्ता २८०८.६८ कोटी रुपये आहे ज्यामध्ये १९९.८८ कोटी रुपये रोख आणि समतुल्य रोख (Cash Equivalent) असल्याचे ताळेबंद (बँलन्सशीटमध्ये) स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी अर्बन कंपनीचा आयपीओ सप्टेंबर २०२५ मध्ये बाजारात दाखल झाला होता. हा इश्यू १०-१२ सप्टेंबर २०२५ पर्यंत खुला होता आणि १७ सप्टेंबरला हा आयपीओ बाजारात सूचीबद्ध (Listed) झाला होता. १९०० कोटींचा बुक-बिल्डिंग इश्यू होता ज्याचा प्राईज बँड ९८ ते १०३ प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. आयपीओ बाजारात सूचीबद्ध होताच शेअर्सची बाजारात चांगली सुरुवात झाली. त्यांची लिस्टिंग प्रिमियम दरासह १६२.२५ वर झाली. कंपनीने तंत्रज्ञान विकास, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, ऑफिस लीज, मार्केटिंग आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी निधी उभारला असल्याचे यावेळी स्पष्ट केले होते. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ५.७५% नुकसान गुंतवणूकदारांना झाले आहे. परंतु निकालापूर्वी कालच्या सत्रात कंपनीच्या शेअररमध्ये २% वाढ नोंदवली गेली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >