व्यवहार १७.८ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले: बँक ऑफ बडोदा
वृत्तसंस्था: सणासुदीच्या काळात युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हा सर्वात पसंतीचा पेमेंट पर्याय म्हणून उदयास आला आहे, युपीआय डिजिटल पेमेंटमध्ये झालेली वाढ प्रामुख्याने ग्राहकांच्या वाढत्या खर्चासह आणि वाढत्या मागणीमुळे झाली आहे, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बँक ऑफ बडोदाच्या अहवालात म्हटले गेले आहे. सणासुदीच्या काळात युपीआय व्यवहारांचे मूल्य झपाट्याने वाढून १७.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीत १५.१ लाख कोटी रुपयांचे होते. विशेषतः दसरा आणि दिवाळी सारख्या प्रमुख सणांमध्ये ही वाढ होत आहे. डिजिटल पेमेंट्स वापराच्या पद्धतींना कसे चालना देत आहेत ते या अहवालात अधोरेखित झाले.
सप्टेंबर २०२५ मध्ये, युपीआय (Unified Payment Interface UPI) ने महिना बेसिसवर (Quarter on Quarter QoQ)मूल्यात २.६% वाढ नोंदवली आहे. ज्यामुळे डिजिटल व्यवहारांमध्ये स्थिर वाढ झाली. याचसोबतच, डेबिट कार्डचा वापर देखील वाढला असून सणासुदीच्या काळात पेमेंट्स ६५३९५ कोटी रुपयांपर्यंत वाढले, जे मागील वर्षी २७५६६ कोटी रुपयांवरून वाढले असे अहवालात म्हटले आहे. अहवालात असेही नमूद केले आहे की युपीआय हा प्रमुख पर्याय राहिला असला तरी डेबिट कार्डचा वापर या वर्षी पुन्हा सुरू झाला आहे. गेल्या काही काळात क्रेडिट कार्ड वापरात वापरात घट होत चालली होती.
दुसरीकडे, क्रेडिट कार्ड व्यवहारांमध्ये स्थिरता दिसून आदी. ज्यामुळे ग्राहकांनी सणासुदीच्या खरेदीसाठी थेट डिजिटल आणि डेबिट-आधारित पेमेंटला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. या पेमेंट पद्धतींमधील एकत्रित डेटा, जो १८.८ लाख कोटी रुपयांचा आहे, तो किरकोळ व्यवहारांमध्ये उत्साहवर्धक ट्रेंड दर्शवितो, जो चालू तिमाहीत उपभोग (Personal Consumption) पुनरुज्जीवनाचे प्रारंभिक संकेत म्हणून पाहिला जातो असे निरिक्षण अहवालाने नोंदवले.
प्रति व्यवहार सरासरी खर्चाच्या बाबतीत, डेबिट कार्डने प्रति व्यवहार ८०८४ रुपये केले आहेत, तर युपीआयसाठी १०५२ रुपये आणि क्रेडिट कार्डसाठी १९३२ रुपयांचे व्यवहार केले आहेत. अहवालातील निष्कर्षानुसार यावरून असे सूचित होते की युपीआय हा लहान आणि मध्यम मूल्याच्या खरेदीसाठीचा पर्याय राहिला आहे, तर डेबिट कार्ड उच्च मूल्याच्या पेमेंटसाठी सुरूच आहेत.
बँक ऑफ बडोदाच्या श्रेणीनुसार डेटा दर्शवितो की सप्टेंबर २०२५ मध्ये, ऑनलाइन बाजारपेठ, कपडे दुकाने, इलेक्ट्रॉनिक दुकाने, सौंदर्य आणि न्हावी प्रतिष्ठाने आणि दारू दुकानांमध्ये खर्चात झपाट्याने वाढ झाली. या श्रेणींमध्ये वर्षानुवर्षे दुहेरी अंकी वाढ नोंदवली गेली, जी सणांशी संबंधित मागणी आणि अलीकडच्या जीएसटी दर कपातीचा संभाव्य परिणाम दर्शवते.
दरवर्षी सणांच्या दिवसांच्या संख्येनुसार समायोजित (Adjusted) केलेल्या बँकेच्या विश्लेषणात असे आढळून आले की व्यवहारांच्या प्रमाणात वाढ ही उपभोगाच्या मागणीत सुधारणा दर्शवते. अहवालात असेही म्हटले आहे की अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या आयकर लाभ आणि जीएसटी कपातीची अपेक्षा यासारख्या संरचनात्मक घटकांमुळे घरगुती खर्चात वाढ झाली आहे.
अहवालात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की सध्याचा कल दुसऱ्या तिमाहीत खाजगी वापराच्या वाढीच्या दृष्टिकोनाकडे निर्देश करतो. 'आम्हाला अपेक्षा आहे की खाजगी वापराच्या मागणीत दुसऱ्या तिमाहीत तेजी येईल. हा कल तिसऱ्या तिमाहीतही कायम राहील' असे अहवालात अंतिमतः नमूद करण्यात आले आहे.






