Saturday, November 1, 2025
Happy Diwali

स्मार्टफोनऐवजी पार्सलमध्ये निघाली टाईल ; बंगळुरूतील सॉफ्टवेअर इंजिनिअरची धक्कादायक फसवणूक

स्मार्टफोनऐवजी पार्सलमध्ये निघाली टाईल ; बंगळुरूतील सॉफ्टवेअर इंजिनिअरची धक्कादायक फसवणूक

बंगळुरू : ऑनलाईन शॉपिंग करताना अनेकदा ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर येतात. अशीच एक घटना बंगळुरूमध्ये घडली असून, येथे एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला १ लाख ८७ हजारांचा स्मार्टफोन मागवल्यानंतर पार्सलमध्ये टाईल मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमध्ये राहणाऱ्या प्रेमानंद या सॉफ्टवेअर इंजिनिअरने सॅमसंग गॅलेक्सी Z फोल्ड ७ हा फोन एका ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून मागवला होता. १४ ऑक्टोबर रोजी त्याने हा फोन ऑर्डर करताना क्रेडिट कार्डद्वारे १ लाख ८७ हजार रुपये पेमेंट केले होते. मात्र १९ ऑक्टोबरच्या संध्याकाळी जेव्हा पार्सल घरी पोहोचलं आणि प्रेमानंदने उत्साहाने बॉक्स उघडला, तेव्हा आत महागड्या फोनऐवजी साधी टाईल पाहून तो थक्क झाला. या धक्कादायक प्रकारानंतर प्रेमानंदने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्याने फोनचा अनबॉक्सिंग व्हिडिओ ही रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये बॉक्समध्ये टाईल असल्याचं स्पष्ट दिसतं. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३१८ आणि ३१९ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

प्रेमानंदने घडलेला संपूर्ण प्रकार अॅमेझॉनला कळवला आणि व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला. तक्रार पाहिल्यानंतर अॅमेझॉनने त्याला १ लाख ८७ हजार रुपयांची रक्कम परत पाठवली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा ऑनलाईन शॉपिंग करावी की नाही हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >