मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील स्मशानभूमी आणि दफनभूमींच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्यावतीने खासगी संस्थांची नेमणूक केली असल तरी प्रत्यक्षात याची स्वच्छता राखली जात नाही. उलट यासाठी नेमलेल्या संस्थेलाच आता कंत्राट संपूनही कालावधी वाढवून दिला जात आहे. ३६ महिन्यांकरता नेमलेल्या संस्थेचा ४५ महिन्यांचा कालावधी करण्यात आला आहे. त्यामुळे १५ कोटी रुपयांचे काम आता तब्बल १८ कोटींवर जावून पोहोचले आहे. या कामांसाठी महापालिकेच्यावतीने नवीन कंत्राटदाराची निवड झाल्याने जुन्या संस्थेलाच कालावधी वाढवून दिला जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) सायंकाळी एक धक्कादायक आणि थरारक ...
मुंबई महापालिकेच्या अखत्यारित एकूण ६८ स्मशानभूमी असून त्यातील ५० स्मशानभूमींची दैनंदिन सफाई राखण्यासाठी ऑगस्ट २०२१मध्ये कंत्राटदाराची तीन वर्षांकरता निवड करण्यात आली होती. यासाठी १५.३१ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे यासाठी सिक्स सेन्स कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली होती. या संस्थेला ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत कालावधी असल्याने यापूर्वी यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु यासाठीची निविदा प्रक्रिया वेळेत न झाल्याने विद्यमान संस्थेला कालावधी वाढवून दिला जात आहे.यासाठीचा वाढीव कालावधी मार्च २०२५ संपुष्टात आल्यानंतरही पुढील कालावधीसाठीही मुदत वाढवून दिली आहे