सणासुदीच्या हंगामात घाऊक आणि किरकोळ विक्रीने गाठला सर्वकालीन उच्चांक
मुंबई:टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड (TMPV) ने जाहीर केले आहे की ऑक्टोबर २०२५ मध्ये कंपनीची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील एकूण विक्री ६१२९५ युनिट्स इतकी झाली, जी ऑक्टोबर २०२४ मधील ४८,४२३ युनिट्सच्या तुलनेत २६.६% वाढ दर्शवते.
ऑक्टोबर २०२५ हा टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडसाठी विक्रमी ठरलेला सणासुदीचा महिना ठरला. या कालावधीत कंपनीने सलग दुसऱ्या महिन्यात सर्वाधिक मासिक घाऊक विक्री नोंदवली, जी ६१,२९५ युनिट्स इतकी होती जी मागील वर्षाच्या तुलनेत प्रभावी २७% वार्षिक वाढ दर्शविते. एसयूव्ही विभागाने विक्रीत आघाडी घेतली असून, ४७००० हून अधिक युनिट्स विक्रीसह मासिक विक्रीत ७७% इतका सर्वाधिक हिस्सा प्राप्त केला.
आकडेवारीनुसार कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतही नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे, जिथे ९२८६ युनिट्स विक्रीसह ७३% वार्षिक वाढ नोंदवली गेली. 'ही कामगिरी टाटा मोटर्सच्या विस्तारित होत असलेल्या ईव्ही पोर्टफोलिओसाठी ग्राहकांच्या वाढत्या पसंतीचे द्योतक आहे.' अशी प्रतिक्रिया कंपनीने दिली आहे.
मजबूत किरकोळ मागणीमुळे सणासुदीच्या काळात विक्रीला अभूतपूर्व वेग मिळाला आणि त्यामुळे मासिक नोंदणींनी देखील नवा विक्रम प्रस्थापित केला. प्रति व्हेरिएंट विचार केल्यास नेक्सॉनने आपल्या मल्टी-पॉवरट्रेन पर्यायांच्या लोकप्रियतेमुळे ५०% वार्षिक वाढ नोंदवली. हॅरियर आणि सफारी यांनीदेखील ७,००० युनिट्सच्या एकत्रित विक्रीसह नवे विक्रम मोडीत काढले ज्यामागे अँडव्हेंचर एक्स व्हेरिएंट्सचा उत्साह आणि हॅरियर.ईव्हीची मजबूत मागणी होती.
मासिक बुकिंग्जनेही सर्वकालीन उच्चांक गाठला, ज्यातून ग्राहकांचा टाटा मोटर्सच्या विविध मॉडेल रेंज आणि पॉवरट्रेन पर्यायांवरील विश्वास स्पष्टपणे दिसून आला. या सणासुदीच्या हंगामातील सर्वात मोठ्या यशांपैकी एक म्हणजे कंपनीने नवरात्री ते दिवाळी या कालावधीत १ लाखांहून अधिक वाहनांची डिलिव्हरी पूर्ण केली जी ३३% वार्षिक वाढ दर्शवणारा एक मोठा टप्पा कंपनीच्या इतिहासात ठरला आहे.






