पुणे : कोंढवा परिसरात झालेल्या गोळीबारात गणेश काळे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. गणेश काळे हा आंदेकर टोळीशी संबंधित असल्याचे सूत्रांकडून समजते. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात गणेश काळे नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनास्थळी एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या गणेश काळेवर नंतर अतिशय जवळून कोयत्याने वार करण्यात आला. या हल्ल्यात गणेश काळेचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृत गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता उर्फ सागर काळे याचा भाऊ असल्याचे समजते. त्ता काळे हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी आहे. यामुळे गणेश काळेच्या हत्येचा आणि कोमकर हत्या प्रकरणाचा काही संबंध आहे की नाही, याचा तपास पोलीस करत आहेत.






