नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील महिला प्रवाशांनी गांजा तस्करी करण्याचे प्रमाण वाढले आहे. ताजी घटना ३० ऑक्टोबर २०२५ ची आहे. फ्लाइट क्रमांक SG-८८ ने बँकॉकहून दिल्लीला आलेल्या एका भारतीय महिला प्रवाशाकडून ९७० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (गांजा) जप्त केला आहे. ही माहिती दिल्ली कस्टम विभागाने दिली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी फ्लाइट क्रमांक SG-८८ ने आलेल्या महिला प्रवाशाला कस्टम ग्रीन चॅनेल ओलांडल्यानंतर अटक करण्यात आली. तिच्या सामानाच्या एक्स-रे तपासणी दरम्यान संशयास्पद प्रतिमा आढळून आल्या. सविस्तर तपासणीनंतर, कस्टम अधिकाऱ्यांना तिच्या सामानातून हिरव्या रंगाचे पदार्थ असलेले व्हॅक्यूम-सील केलेले हायड्रोपोनिक गांजाची पॅकेट आढळून आले. या पॅक केलेल्या सामानाचे एकूण वजन ९७० ग्रॅम होते. या अंमली पदार्थाचा स्रोत आणि प्राप्तकर्ता कोण आहे हे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
मागील आठवड्यात सुद्धा बँकॉकहून प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांनी फणस वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॉलिथिन बॅगस् मधून सुमारे पाच किलो गांजा तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये एकूण सहा जणांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे असलेल्या ड्रग्जची किंमत बाजारात ४.९४ कोटी रुपये एवढी होती.






