प्रतिनिधी:केंद्रीय वित्त मंत्रालयाने जीएसटी संकलनाची (GST Collection) आकडेवारी जाहीर केली. त्या माहिती आधारे, अधिकृत आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन ४.६% वाढून सुमारे १.९५ लाख कोटी झाले आहे,जे गेल्या वर्षी याच महिन्यात सुमारे १.८७ लाख कोटी होते. ऑक्टोबर महिन्यात, केंद्रीय-जीएसटी, राज्य-जीएसटी, व एकात्मिक-जीएसटीचे संकलन वर्षानुवर्षे वाढले असून उपकर संकलन (Cess) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) घसरले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. अलीकडील जीएसटी संग्रह भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मकता अधोरेखित करतात.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील एप्रिल-ऑक्टोबर तिमाहीत जीएसटी संकलन थेट ९.०% वाढून सुमारे १३.८९ लाख कोटी रुपये झाले आहे. जे गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत १२.७४ लाख कोटी रुपये होते. या प्रकरणात देखील, सर्व घटक - सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी वाढले आहेत, तर उपकर मात्र कमी झाला होता.
भारताच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीने २०२४-२५ मध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, ज्यामध्ये २२.०८ लाख कोटी रुपयांचा विक्रमी संकलन केले गेले आहे. झाला. इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तुलनेत हे संकलन ९.४ % वाढ दर्शवितो.
गेल्या काही वर्षांत जीएसटी संग्रहात सातत्याने वाढ झाली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ११.३७ लाख कोटी रुपयांवरून २०२३-२४ मध्ये २०.१८ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तज्ञांच्या मते ही वाढ मजबूत आर्थिक क्रियाकलाप ( Strong Economic Activity) आणि चांगल्या अनुपालनाचे (Regulatory Norms) चे प्रतिबिंब आहे.'
३ सप्टेंबर रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच, पुढील पिढीच्या जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) सुसूत्रीकरणाअंतर्गत मोठे बदल करण्यात आले.
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सुलभ करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलत, जीएसटी परिषदेने त्यांच्या ५६ व्या बैठकीत जीएसटी रचनेचे चार स्लॅब (५%, १२%, १८%, २८%) वरून दोन मुख्य दरांमध्ये घट केली - ५% (गुणवत्ता दर) आणि १८% (मानक दर) तसेच पाप/चैनीच्या वस्तूंसाठी ४०% विशेष दर स्लॅब घोषित करण्यात आला होता.
आर्थिक विकासाला चालना देताना नागरिकांवरील कराचा भार कमी करण्याच्या उद्देशाने हे करण्यात आले. २२ सप्टेंबर, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, जीएसटी दरांमधील सर्व बदल लागू झाले आहेत. या विषयावर माध्यमांशी बोलताना डेलॉइट इंडियाचे भागीदार आणि अप्रत्यक्ष कर प्रमुख महेश जयसिंग म्हणाले, 'जीएसटी दर सुसूत्रीकरणामुळे जीएसटी उत्सव धमाका आणि जीएसटी दरात लक्षणीय कपात झाल्यामुळे, ऑक्टोबर २०२५ मध्ये भारताचे जीएसटी संकलन १.९६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले, जे वार्षिक ४.६% वाढ दर्शवते आणि उत्सवाच्या गती आणि वाढीव अनुपालन दरम्यान आपल्या अर्थव्यवस्थेची लवचिकता अधोरेखित करते.'