Saturday, November 1, 2025
Happy Diwali

Tata Motors Demerger: अखेर बाहुप्रतिक्षित व महत्वाकांक्षी घोषणा टाटा मोटर्सने केली डीमर्जर घोषित केल्याने आता प्रवासी व व्यवसायिक वाहने कंपन्याचे विविधीकरण शक्य

Tata Motors Demerger: अखेर बाहुप्रतिक्षित व महत्वाकांक्षी घोषणा टाटा मोटर्सने केली डीमर्जर घोषित केल्याने आता प्रवासी व व्यवसायिक वाहने कंपन्याचे विविधीकरण शक्य

मोहित सोमण: टाटा मोटर्सने अखेर बहुप्रतिक्षित डिमर्जरची घोषणा केली आहे. स्कीम ऑफ अरेजमेंट अंतर्गत मार्च महिन्यात ही प्रस्तावित घोषणा टाटा मोटर्सने केली होती. त्याची अधिकृत माहिती कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये सेबीला दिली आहे. त्यामुळे याला प्रस्तावाला घोषणेमुळे मुहूर्त स्वरूप आले आहे. टाटा मोटर्सने आपल्या व्यवसायिक वाहनांच्या डिमर्जरची अंतिम घोषणा शुक्रवारी उशीरा केली आहे. त्यामुळे आता टाटा कर्मशिअल व्हेईकल लिमिटेडचे डिमर्जर झाल्याने त्या आस्थापनेचे नवे नाव टाटा मोटर्स होणार आहे.

एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सने म्हटले आहे की,' मंजूर केलेल्या कंपोझिट स्कीम ऑफ अरेंजमेंटनुसार, २९ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या नवीन सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशनद्वारे नाव बदलण्याची औपचारिकता देण्यात आली आहे.'

एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्याच डिमर्जर योजनेचा भाग म्हणून १३ ऑक्टोबर २०२५ रोजी टाटा मोटर्स लिमिटेडचे स्वतःचे नाव टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड (TMPV) असे ठेवण्यात आले. टाटा मोटर्स डिमर्जर योजनेनुसार, कंपनीचे पॅसेंजर व्हेईकल आणि कमर्शियल व्हेईकल व्यवसाय दोन स्वतंत्र संस्थांमध्ये विभागले गेले आहेत.

आता टाटा मोटर्स डिमर्जरची प्रभावी अथवा अंमलबजावणी तारीख (Effective Date) १ ऑक्टोबर २०२५ होती, तर टाटा मोटर्स डिमर्जरची रेकॉर्ड तारीख १४ ऑक्टोबर २०२५ होती. प्रक्रियेचा भाग म्हणून, रेकॉर्ड तारखेनुसार नोंदणीकृत भागधारकांना टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये असलेल्या प्रत्येक शेअरसाठी टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेड (TMLCV) चा एक शेअर मिळाला. यामुळे TMLCV आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड (TMPV) दोन्हीमध्ये समांतर होल्डिंग्ज निर्माण झाल्या आहेत. यापूर्वीच भागभांडवलधारकांना त्यांच्या डी मॅट खात्यात समभाग (Stocks) क्रेडिट झाले होते. १:१ या गुणोत्तरात हे शेअर गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा झाले होते.

या योजनेनुसार,TML (Tata Motors Limited) चा व्यावसायिक वाहन व्यवसाय उपक्रम TMLCV मध्ये विलिन करण्यात आला आहे आणि तर TMPV (Tata Motors Passenger Vechiles Limited) हे आता टाटा मोटर्स लिमिटेड (TML) मध्ये विलीन झाले आहे. ही योजना १ ऑक्टोबर २०२५ पासून प्रभावी आहे आणि नियुक्त तारीख १ जुलै २०२५ आहे.

कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये नेमक्या शब्दात म्हटले आहे की,' TML ही एक सूचीबद्ध संस्था राहील. या योजनेनुसार, टाटा मोटर्स लिमिटेड त्याचे नाव बदलून टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड करेल आणि इलेक्ट्रिक वाहन व्यवसाय आणि JLR मध्ये गुंतवणूकीसह प्रवासी वाहनांचा व्यवसाय करेल.

तसेच TML कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेडचे नाव टाटा मोटर्स लिमिटेड असे बदलले जाईल.रेकॉर्ड डेटवर, TML च्या शेअरची किंमत स्टॉक एक्सचेंजच्या किंमत शोध यंत्रणेद्वारे व्यावसायिक वाहन व्यवसायाच्या विलिनकर्त्याला विचारात घेऊन समायोजित केली जाईल. TML च्या पात्र शेअरहोल्डर्सची यादी अंतिम झाल्यानंतर, TMLCV मधील शेअर्सचे वाटप केले जाईल आणि त्यानंतर, असे शेअर्स स्टॉक एक्सचेंज, म्हणजेच BSE आणि NSE वर सूचीबद्ध केले जातील' असे कंपनीने स्पष्ट केले.

दरम्यान फायलिंगमध्ये,'टाटा मोटर्स कर्मशिअल व्हेईकल लिमिटेडचे (TMLCV) द्वारे शेअर्स वाटप केल्याच्या तारखेपासून ते BSE आणि NSE वर सूचीबद्ध होण्याच्या तारखेपर्यंत, TMLCV चे शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर ट्रेडिंगसाठी उपलब्ध राहणार नाहीत. स्टॉक एक्सचेंजमध्ये आवश्यक अर्ज भरल्याच्या तारखेपासून लिस्टिंग आणि ट्रेडिंग परवानगी मिळविण्याच्या प्रक्रियेला साधारणपणे ४५-६० दिवस लागतात.TML मधील इक्विटी शेअर्स आणि TMLCV मधील इक्विटी शेअर्सच्या 'अधिग्रहणाच्या किंमती' बद्दल मार्गदर्शन योग्य वेळी तुम्हाला कळवले जाईल.' असेही कंपनीने यावेळी स्पष्ट केले.

त्यामुळे ही टाटा मोटर्सची पुन्हा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्वाची आहे.ही पुनर्रचना केवळ टाटा मोटर्ससाठीच नाही तर व्यापक भारतीय शेअर बाजारासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे जिथे दोन्ही विभाग आता त्यांचे मार्ग स्वतंत्रपणे आखतील ज्यात एक प्रवासी आणि ईव्ही वाहनात तर दुसरी व्यावसायिक वाहतूक आणि फ्लीट सोल्यूशन्समध्ये ही विभागणी होईल. प्रामुख्याने 'कॉर्पोरेट रणनीतीचा भाग म्हणून ही रिअरेंजमेंट केली' असल्याचे कंपनीने म्हटले यातून 'दोन्ही कंपन्यांना आपली मार्केट रणनीती विविध गरजा, विविध धोरणे लक्षात घेता उद्देश ठेवणे सोपे जाईल.' असे कंपनीने यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >