Saturday, November 1, 2025
Happy Diwali

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

पंढरपूर: कीर्तन परंपरेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे कोकणातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप महाराज यांचं शुक्रवारी पहाटे पंढरपूर येथे निधन झालं. कार्तिकी एकादशी निमित्त ते पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते.

गुरुवारी रात्री ते कीर्तन करून आपल्या निवासस्थानी परतले असता त्यांना पहाटे अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारापूर्वीच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

वैभववाडी तालुक्यातील आखवणे पुनर्वसन गावठण येथील रहिवासी असलेल्या नागप महाराजांनी वडिलांकडून कीर्तन परंपरेचा वारसा घेतला आणि तो अखेरपर्यंत जपला.

कीर्तनकार सोबत समाजसेवकही होते. मुंबईतील बेस्ट खात्यात अधिकारी म्हणून सेवा दिल्यानंतर निवृत्तीनंतर ते पूर्णपणे समाजकार्यात गुंतले. अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई सरचिटणीस म्हणून कार्यरत राहून त्यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अनेकांना सानुग्रह अनुदान मिळालं. तसेच आखवणे भोम आणि नागपवाडी पुनर्वसन गावठण उभारणीतही त्यांचा मोलाचा वाटा होता.

शांत, संयमी, अभ्यासू आणि सेवाभावी व्यक्तिमत्व असलेल्या या कीर्तनकाराच्या निधनाने संपूर्ण वारकरी संप्रदायात आणि वैभववाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >