Saturday, November 1, 2025
Happy Diwali

मोंथा चक्रीवादळाचे १२ बळी

मोंथा चक्रीवादळाचे १२ बळी

अनेक भागात पूरसदृश स्थिती

तेलंगणा : मोंथा' वादळाने केवळ जनजीवनच नव्हे, तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान केले आहे. शेकडो कोटी रुपयांची पिके पाण्याखाली गेली आहेत. या वादळाचा सर्वात मोठा तडाखा तेलंगणाला बसला आहे. मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि संपूर्ण तेलंगणा राज्यात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जुन्या वारंगल जिल्ह्यातच आठ जणांचा मृत्यू झाला. या विनाशकारी नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झाली आहे.

मोंथा चक्रीवादळामुळे आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मोंथा चक्रीवादळामुळे रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली . या वादळामुळे प्रशासन सतर्क झाले असून, सखल भागातील लोकांना बाहेर काढून मदत छावण्यांमध्ये हलवले आहे. आपत्ती निवारण पथके एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि इतर बचाव पथके मदत कार्यात सतत गुंतलेली आहेत. या चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >