नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन तिकीट बुकींगच्या प्रक्रीयेला अधिक सोपी आणि पारदर्शक बनवण्यासाठी अनेक महत्वाचे बदल केले जात आहेत. रेल्वेने ‘रेल्वेवन’ नामक एक सुपर अॅप लाँच केले आहे. हे अॅप प्रवाशांच्या एक वन-स्टॉप सॉल्यूशन रुपात कार्य करते. ज्याच्या माध्यमातून आरक्षित तसेच अनारक्षित तिकीट देखील बुक करता येणार आहे.
याशिवाय या अॅपवर ट्रेनची लाईव्ह स्थिती, प्लॅटफॉर्मची माहिती आणि अन्य सेवा देखील उपलब्ध आहेत. अनेकदा प्रवाशांची तक्रार असते की ‘लोअर बर्थ प्रेफरेंस’ निवडूनही त्यांना साईड अपर, मिडील वा अपर बर्थ दिली जाते. या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी रेल्वेने एक नवीन व्यवस्था लागू केली आहे. रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण प्रणालीत ज्येष्ठ नागरिकांना, ४५ वर्षांहून अधिक वयाच्या महिला तसेच गर्भवती महिलांना लोअरबर्थ देण्याची विशेष व्यवस्था केलेली आहे. परंतू ही सुविधा आसनांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.
या शिवाय प्रवाशांच्या जवळ आता एक विशेष पर्याय असणार आहे. ‘बुक ओनली इफ लोअर बर्थ इज अव्हेलेबल’, म्हणजे जर लोअर बर्थ उपलब्ध नसेल तर तिकीट बुक होणार नाही. यामुळे प्रवाशांना त्यांच्या पसंतीनुसार आसन सुविधा मिळण्याची सोय उपलब्ध होईल.
जर बुकींगच्या वेळी लोअर बर्थ उपलब्ध नसेल आणि पात्र प्रवाशाला अपर वा मिडल बर्थ मिळाली असेल, तर आता टीटीईला अधिकार दिला गेला आहे की तो प्रवासादरम्यान रिकामी असलेली लोअर बर्थ तो अशा प्रवाशाला देऊ शकतो. रेल्वेने रिझर्व्ह कोचमध्ये झोपण्याच्या आणि बसण्याच्या वेळांसंदर्भात नियम स्पष्ट केले आहेत. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत झोपण्याची वेळ निर्धारित केलेली आहे. या दरम्यान प्रवासी आपल्या निर्धारित बर्थवर झोपू शकतात. परंतू दिवसा बर्थवर बसण्याची व्यवस्था असेल. आरएसी प्रवाशांसाठी ही व्यवस्था आहे की दिवसा साईड लोअर बर्थवर आरएसी प्रवासी आणि साईड अपर बर्थवर बुक प्रवासी बसू शकतात. परंतू रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लोअर बर्थचा अधिकार केवळ लोअरबर्थ वाल्या प्रवाशाचा राहील.
रेल्वेने आरक्षित तिकीटांची आगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) १२० दिवसांहून घटवून आता ६० दिवस केला आहे. आता प्रवासी प्रवास तारखेच्या केवळ ६० दिवस आधीपर्यंत तिकीट बुक करु शकतात. हा नियम १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू झाला आहे. या पावलाचा उद्देश्य तिकीट बुकींगमध्ये पारदर्शकता आणणे आणि ‘सिट ब्लॉकिंग’ सारख्या प्रवृत्तीला समाप्त करणे आहे. रेल्वे प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी बुकींगच्या वेळी आपली प्राथमिकता नोंदवावी.
मुख्य तिकीट निरीक्षक आरएन यादव यांनी सांगितले की नवीन नियम १ नोव्हेंबर पासून लागू केला आहे. त्यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांहून अधिकच्या महिला आणि गर्भवती महिलांनी लोअर बर्थ प्राधान्याने निवडावी. तर अन्य प्रवासीही जर केवळ लोअर बर्थनेच प्रवास करु इच्छीत असतील तर नवीन पर्याय निवडू शकतात.






