मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने भांडुप येथील उषा नगर नाल्यावरील जुन्या पुलांचे बांधकाम पाडून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेत मे २०२१मध्ये कामाला सुरुवात झाली. परंतु, या उषा नगर नाल्यावरील ३ पुलांच्या बांधकामासाठी मंजूर केलेल्या निधीच्या तुलनेत तब्बल ११ कोटी रुपयांचा खर्च आता वाढला गेला आहे.
मुंबईतील भांडूप (पूर्व) येथे वीर सावरकर मार्गावर मेनन कॉलेज जवळ चांमुडानगर, चांमुडानगर आणि हेमापार्क यामधील मेनन कॉलेज येथील तसेच वीर सावरकर मार्गावर हेमापार्क जवळील नाल्यावरील पूल जुने झाल्याने ते पूल पाडून नवीन बांधण्यासाठी मे २०२१ रोजी महापालिकेच्यावतीने काम हाती घेण्यात आले होते. या तिन्ही पुलांच्या बांधकामासाठी ३३.४६ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आणि यासाठी एपीआय कंस्ट्रक्शन कंपनीचा निवड केली होती. या कंपनीच्या माध्यमातून सुरु असलेल्या या तिन्ही पुलांचा खर्च आता ११ कोटी रुपयांनी वाढवून ४४.६३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उषानगर नाल्यावरील धोकादायक तीन पुलांचे बांधकाम पाडून त्यांची पुनःर्बाधणी करण्याचे ही कामे आतापर्यंत ८० टक्के पुर्ण झाले असून प्रगतीपथावर आहेत. विशेष म्हणजे हे काम पावसाळा वगळून २२ महिन्यांमध्ये करायचे होते ते आता पावसाळा वगळून ३६ महिन्यांमध्ये केले जात आहे. यामध्ये जुन्या अस्तित्वात असलेल्या पुलावर ६०० व ९०० मिली मीटर व्यासाच्या जलवाहिन्या स्थलांतर करण्याकरिता समांतर पुलाचे बांधकाम व आवश्यक इतर कामांचा समावेश करावा लागला. ही सर्व कामे रेल्वे रुळाच्या जवळ असल्यामुळे पाण्याच्य पाईन लाईन वळवण्याचे वाढीव काम करावे लागले, यासाठी लोखंडी गर्डर्सची लांबी २० मीटरवरून २७ मीटर एवढी करावी लागली. तसेच ६०० मि.मी आणि ९०० मि.मी व्यासाच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या फाऊंडेशनचे काम ओपन फाऊंडेशन वरून पाईल फाऊंडेशन करावे लागले. तसेच पावसाळ्यामध्ये नाल्याच्या वरील बाजुला पाणी साचू नये म्हणून पाण्याचा त्वरीत निचरा होण्याकरता उच्च प्रतिचे पंप, संरक्षक भिंत आणि टच पाईल यांची वाढीव कामे ही अतिरिक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा खर्च वाढल्याचे पर्जन्य जल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील स्मशानभूमी आणि दफनभूमींच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्यावतीने खासगी संस्थांची नेमणूक केली असल तरी प्रत्यक्षात याची ...
महापापालिकेच्यावतीने हाती घेतलेल्या पुलांची कामे
भांडूप (पूर्व) येथे वीर सावरकर मार्गावर मेनन कॉलेज जवळ चांमुडानगर येथील नाल्यावरील पूल.
भांडूप (पूर्व) येथे चांमुडानगर आणि हेमापार्क यामधील मेनन कॉलेज येथील नाल्यावरील पूल.
भांडूप (पूर्व) येथे वीर सावरकर मार्गावर हेमापार्क जवळील नाल्यावरील पूल.





