मुंबई : मुंबईतील पवईमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. रोहित आर्या या व्यक्तीने १७ लहान मुलांना ओलीस ठेवलं होत. तसच रोहितकडे पोलिसांना फायर गन आढळली होती. लहान मुलांना वाचवण्याच्या हेतूने रोहित आर्या याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला.
ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसाच्या दोन तीन दिवस आधी अनेक मराठी कलाकार त्या स्टुडिओमध्ये येऊन गेले होते.
अभिनेत्री रुचिता जाधव हिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्यालाही रोहित आर्याने चित्रपटसंबंधी भेटायला बोलावले होते हे सर्वांना सांगितले.
रुचितांनंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याने पोस्ट लिहीत रोहित आर्या बद्दल धक्कादायक माहिती दिली होती. मराठी मालिका सिनेमात प्रसिद्ध असणारा अभिनेता आयुष्य संजीव याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे "घटनेच्या केवळ दोन दिवस आधी माझी रोहित आर्यशी भेट झाली होती. त्याने मला त्याच्या आगामी 'लेट्स चेंज ४' या चित्रपटात एका भूमिका ऑफर केली होती. त्यावेळी त्याने सांगितलेली कथा आणि नंतर जे काही घडले त्या घटनेशी मिळती जुळती होती. ही संपूर्ण घटना माझ्यासाठी खूपच धक्कादायक होती.
मी त्याला गेले ८-९ वर्ष ओळखतो , मी त्याच्याबरोबर सिनेमाही केला होता. त्या ओळखीमुळे मला त्याच्या हेतुंवर कसूभरही शंका आली नाही.
आयुषने शेवटी सांगितले " जे काही घडले ते अतिशय धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे होते. सुदैवाने ती मुलं सुरक्षित आहेत, हाच एक आनंद






