Friday, October 31, 2025
Happy Diwali

मन्नत मध्ये रूम मिळेल का? या प्रश्नावर शाहरुख खानचे "हे" मिश्किल उत्तर

मन्नत मध्ये रूम मिळेल का? या प्रश्नावर शाहरुख खानचे

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याने गुरुवारी ऑक्टोबर २०२५ रोजी त्याच्या ट्विटर पेजवर 'Ask SRK' सेशन ठेवत चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले. शाहरुख खानने विशेष सेशनमध्ये अनेक चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

किंग खानचा २ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. आणि त्याच्या आधी शाहरुखानने चाहत्यांना दिलेल्या या सरप्राईजमुळे चाहते भलतेच खुश झाले आहेत.

चाहत्याने मन्नतमध्ये मागितली खोली

शाहरुखानचा वाढदिवस २ नोव्हेंबरला असल्याने काही चाहते त्याच्या भेटीसाठी मुंबईत येत आहेत . त्याच वेळी एका चाहत्याने या 'Ask SRK' या सेशन मध्ये विचारले आहे की "तुमच्या वाढिवसानिमित्त तुम्हाला भेटायला आम्ही मुंबईत आलो आहोत पण कुठेही राहायला खोली मिळत नाहीये तर 'मन्नत मध्ये एक खोली मिळेल का?" असा मिश्किल प्रश्न चाहत्याने विचारला यावर किंग खानने मजेशीर उत्तर दिलंय. तो म्हणाला, 'मन्नत मध्ये माझ्याकडेच एकही खोली नाहीये, हल्ली मीच स्वतः भाड्याने राहत आहे'. असे उत्तर दिले आहे शाहरुख खानच्या या उत्तराने चाहत्यांमध्ये एकच हशा पिकला.

आणखी एक चाहत्याने शाहरुखला प्रश्न विचारला तो म्हणजे "सर मुलींना खुश करण्यासाठी काय करायला पाहिजे ?" त्यावर शाहरुखने माझे गाणे ट्राय करा असा मिश्किल सल्ला दिला आहे. त्याचबरोबर एका चाहत्याने सर "किंग" या चित्रपटाची अपडेट तुम्ही द्याल की आम्ही ज्योतिषाला विचारू? असा सवाल केला. यावर त्याने उत्तर म्हणून "नाही नाही, सिद्धार्थ आनंदच माझ्या तारखा ज्योतिषाकडे मागत आहे" असा खरमरीत रिप्लाय केला आहे.

शाहरुखच्या या सेशन मुळे चाहते भलतेच खुश झाले आहेत

Comments
Add Comment