 
                            मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. गिफ्ट निफ्टीतील वाढीनंतर तेजीचे संकेत मिळाले होते. भूराजकीयदृष्ट्या सकारात्मकता कायम असल्याने गुंतवणूकदारांना अनुकुल असे वातावरण तयार होत आहे. कालच्या मंथली एक्सपायरीनंतर आज पुन्हा एकदा बाजार 'हिरव्या' रंगात परतला आहे. सेन्सेक्स २३३.३४ अंकांने व निफ्टी ५३.२० अंकांने उसळला आहे. कालच्या घसरणीनंतर आज बँक सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकाने फेडरल रिझर्व्ह व्याजदरात आगामी कपातीच्या भाकीतामुळे वापसी केली आहे. कालच्या चीन व युएस यांच्यातील बोलणीवर अस्थिरता कायम असल्याचा फटका आशियाई बाजारातही बसला होता. आज मात्र युएसमधील आयटी शेअरमधील वाढीच्या आधारसह पुन्हा एकदा दोन्ही देशांत सकारात्मक बोलणी सुरू झाल्याने तसेच चीनवरील टॅरिफ युएसने ५७% वरुन ४७% वर नेल्याने आशियाई बाजाराह भारतीय बाजारात वाढ होत आहे.
व्यापक निर्देशांकातील मिडकॅप ५० (०.३४%),स्मॉलकॅप ५० (०.३८%), स्मॉलकॅप १०० (०.४९%), मिडकॅप ५० (०.३४%) निर्देशांकात वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील सकाळच्या सत्रात हेल्थकेअर (०.४२%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.१७%), मिडिया (०.२८%), फार्मा (०.२४%), मेटल (०.१३%) समभागात घसरण झाली असून सर्वाधिक वाढ ऑटो (१.०१%), पीएसयु बँक (१.०५%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.४२%), रिअल्टी (०.९६%) निर्देशांकात झाली आहे.
तरीही चीनमध्ये ऑक्टोबरमध्ये चीनच्या उत्पादन क्रियाकलापांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त घट झाली आहे, जी सहा महिन्यांतील सर्वात कमी पातळीवर आले असल्याचे शुक्रवारी एका अधिकृत सर्वेक्षणात दिसून आले आहे. कारण या महिन्यात वॉशिंग्टनसोबत व्यापारी तणाव पुन्हा निर्माण झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये 'पूर्णपणे' स्थिरता नाही. विशेषतः आशियाई बाजारातील आज जपान बाजारात उच्चांकी झाली. युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील बैठकीनंतर वॉशिंग्टन आणि बीजिंगमधील शांततेचे मूल्यांकन गुंतवणूकदारांनी केल्याने शुक्रवारी आशियातील शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. आज आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात संमिश्रित प्रतिसाद मिळत आहे. कोसपी (०.५५%), तैवान (०.१६%), निकेयी (१.७२%), गिफ्ट निफ्टी (०.२१%) बाजारात वाढ झाली सर्वाधिक असून घसरण मात्र हेंगसेंग (०.८२%), शांघाई कंपोझिट (०.६३%) बाजारात झाली.
गुरुवारी दक्षिण कोरियामध्ये झालेल्या उच्च-स्तरीय बैठकीत त्यांनी एक प्रकारचा व्यापार करार केला, ज्यामुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांना पूर्ण विकसित व्यापार युद्धात ढकलण्याचा धोका असलेल्या दुर्मिळ पृथ्वी घटकांवरील वाद कमी झाला. आज सकाळच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक ०.३५% पातळीवर घसरला आहे. तरीही अस्थिरतेच्या (Volatility) वर गुंतवणूकदारांना सावधगिरीचा सल्ला बाळगला जातो. कालही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात मोठी विक्री केल्याने अद्याप धोका टळलेला नाही.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ नवीन फ्लुओ इंटरनॅशनल (१२.५२%), युनायटेड स्पिरीट (५.७१%), स्टार हेल्थ इन्शुरन्स (३.६०%), फोर्स मोटर्स (३.१५%), युनियन बँक (२.९९%), लोढा डेव्हलपर्स (२.६७%), येस बँक (२.३८%), सम्मान कॅपिटल (२.३२%), इंटलेक्ट डिझाईन (२.१३%), जिलेट इंडिया (२.०९%), स्विगी (१.९६%) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण बंधन बँक (४.८२%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (४.६१%), अदानी पॉवर (२.०२%), इंडिजेन (१.९३%), वरूण बेवरेज (१.५८%), सी ई इन्फोसिस्टिम (१.५६%), डाबर इंडिया (१.५२%), सिप्ला (१.४९%), वेदांत फॅशन (१.४६%), सिप्ला (१.४९%), नेटवेब टेक्नॉलॉजी (१.३८%), एनटीपीसी (१.३५%), वेदांता (१.२१%), सिटी युनियन बँक (१.१८%) समभागात झाली आहे.

 
     
    




