Friday, October 31, 2025
Happy Diwali

राज्याच्या मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत राजेश अग्रवाल यांचे नाव

राज्याच्या मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत  राजेश अग्रवाल यांचे नाव

हरित बंदर विकासविषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा

मुंबई : नेस्को गोरेगाव येथे सुरू असलेल्या इंडिया मेरीटाईम वीकमध्ये गुरुवारी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६० कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.

महाराष्ट्र सागरी मंडळाचे हे करार इचंडिया आणि नॉलेज मरीन या कंपन्यांसोबत करण्यात आले आहे. यामुळे हरित टगबोटी साठी बॅटरी निर्मिती आणि जहाज बांधणी व दुरुस्ती बंदर उभारणी या प्रकल्पांचा समावेश आहे.

यावेळी मंत्री राणे यांनी ग्रीन जहाज बांधणी आणि बंदर उभारणी याविषयी डेन्मार्क येथील कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा केली. तसेच करंजा, दिघी या बंदरांच्या विकासाविषयीही गुंतवणुकीस उत्सुक असलेल्या कंपन्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी बंदर विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन खारा यांच्यासह संबंधित अधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >