Saturday, November 22, 2025

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय देखील साप्ताहिक सुट्टीनिमित्ताने दर बुधवारी बंद असते. मात्र, असे असले तरी राणीची बाग बुधवारी जनतेसाठी खुली ठेवण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी पर्यटकांना बागेत प्रवेश बंद असेल. दररोज शेकडो पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. दरम्यान, ही बाग साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >