 
                            पुणे : गुंड निलेश घायवळ हा लंडनमध्ये आहे. इंग्लंडच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे. निलेश घायवळचा मुलगा लंडनमध्ये शिकत आहे. मुलाला सोबत म्हणून निलेश घायवळ लंडनमध्ये आहे. त्याच्या व्हिसाची मुदत ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आहे. ही महिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने गुंड निलेश घायवळच्या आईवडिलांना नोटीस बजावली आहे.
पुणे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी निलेश घायवळ याला हजर करावे, असे या नोटीसमध्ये नमूद आहे. निलेश घायवळ याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, या गुन्ह्यांच्या संदर्भात तातडीने चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर करणं बंधनकारक आहे, असंही पुणे पोलिसांनी बजावलं आहे. आता निलेश घायवळ पोलिसांपुढे हजर झाला नाही तर त्याच्या आईवडिलांना पोलीस अटक करण्याची शक्यता आहे. थोडक्यात पोलिसांनी घायवळची पुरती कोंडी करायला सुरुवात केली आहे.
पुणे पोलिसांनी लंडन पोलिसांना पत्र पाठवून घायवळला तिथेच अटक करुन पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्याची विनंती केली आहे. या संदर्भात लंडनच्या पोलिसांचे म्हणणे अद्याप समजले नाही. मात्र घायवळच्या आईवडिलांनी निलेश घायलवळला मुद्दाम अडकवले जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
घायवळला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवायची आहे. त्याच्या या योजनेत अडथळा आणण्यासाठी काही राजकीय वर्तुळातील लोकांनीच त्याला खोट्या केसमध्ये अडकवले असल्याचा आरोप घायवळच्या आीवडिलांनी केला आहे.

 
     
    




