 
                            मुंबई : मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी उद्या निवडणूक आयोगाविरोधात “सत्याचा मोर्चा” काढण्याची घोषणा केली आहे. या मोर्चात अनेक विरोधी नेते सहभागी होणार आहेत
या मोर्चात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार, तसेच काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. मोर्चाची सुरुवात दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटवरून होणार होती. मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा मोर्चा जाणार होता.
मात्र, या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आझाद मैदानाच्या बाहेर मोर्चा काढण्यास नियमांनुसार परवानगी देता येत नाही. आझाद मैदानाच्या आत आंदोलन करता येईल, परंतु बाहेरून मोर्चा निघाल्यास तो विनापरवाना ठरेल. आणि विनापरवाना मोर्चा काढल्यास आंदोलनकर्त्यांवरती कारवाई होण्याची शक्यता आहे.
राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेला इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “विनापरवाना मोर्चा काढल्यास नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल.” त्यामुळे विरोधकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

 
     
    




