Friday, October 31, 2025
Happy Diwali

IMD Weather Update : चिंता वाढली! मोथा चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच 'कमी दाबाचा पट्टा' निर्माण; पुढचे ४८ तास धोक्याचे, महाराष्ट्रासाठी IMDचा नवा इशारा!

IMD Weather Update : चिंता वाढली! मोथा चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच 'कमी दाबाचा पट्टा' निर्माण; पुढचे ४८ तास धोक्याचे, महाराष्ट्रासाठी IMDचा नवा इशारा!

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD - Indian Meteorological Department) देशासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नागरिकांची चिंता पुन्हा वाढली आहे. 'मोथा' चक्रीवादळाचा (Motha Cyclone) प्रभाव हळूहळू कमी होत असला तरी, त्यामुळे आता पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबामुळेच अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस तर काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

पूर्वोत्तर भारतात अतिमुसळधार पावसाचा इशारा; अनेक राज्यांसाठी 'रेड अलर्ट'

भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांसाठी पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा अंदाज आणि सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पूर्वोत्तर राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. दक्षिण भारतात (South India) या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यामध्ये आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांचा समावेश आहे. राजस्थानमध्ये या काळात ढगाळ वातावरण राहणार असून, मधून मधून पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट'

महाराष्ट्रामध्ये पुढील एक ते दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, अनेक भागांना भारतीय हवामान विभागाने (IMD) 'यलो अलर्ट' (Yellow Alert) दिला आहे. राज्यात या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे या वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील चार जिल्ह्यांना (रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर) आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (Thunderstorm Warning) असून नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि धुळे या चार जिल्ह्यांमध्ये 'हाय अलर्ट' (High Alert) जारी करण्यात आला आहे.

'या' भागात यंदा सर्वाधिक पाऊस होऊनही संकट कायम

गेल्या काही महिन्यांमध्ये मराठवाड्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. राज्यात यंदाच्या वर्षी सर्वाधिक पाऊस हा याच विभागात झाला असून, या पावसामुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढे नुकसान होऊनही, आता पाऊस पाठ सोडायला तयार नाहीये. हवामान विभागाने पुन्हा एकदा मराठवाड्यात पावसाचा इशारा (Rain Warning) दिला आहे. यानुसार, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची (Light to Moderate Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे येथील शेतकरी (Farmers) अजूनही मोठ्या चिंतेत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा