Friday, October 31, 2025
Happy Diwali

खडसेंच्या बंगल्यातील चोरी प्रकरणी मोठी अपडेट

खडसेंच्या बंगल्यातील चोरी प्रकरणी मोठी अपडेट

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील बंगल्यात तीन दिवसांपूर्वी चोरी झाली होती आता त्या बंगल्यात झालेल्या चोरी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस तपासात या प्रकरणाचे उल्हासनगर कनेक्शन समोर आले आहे. तिथल्या दोन सख्ख्या सराईत गुन्हेगार भावांचा या चोरीत सहभाग असल्याचे तपासातून कळले आहे.

एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावातील त्यांचे घर काही दिवसांपासून आहे. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला..

चोरीची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. एकनाथ खडसे यांच्या शिवरामनगर येथील बंगल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली. सात ते आठ तोळे सोने, तब्बल 35 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे, फाइल्स, सीडीज आणि पेन ड्राइव्ह चोरीला गेल्याचे समोर आले.

सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाचा पाठपुरावा करत जळगाव पोलीस उल्हासनगरपर्यंत पोहोचले. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या सहकार्याने पुढील तपास सुरू झाला. पोलिसांना खबऱ्यांनी माहिती दिली की दोन सख्खे भाऊ काही दिवसांपूर्वी बाहेरगावी जाऊन आले आणि त्यांच्या हालचाली संशयास्पद आहेत. ही माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. सीसीटीव्ही तपासात समोर आले की, हे संशयित जळगाव शहरातील आपल्या नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्त आले होते. त्याच काळात त्यांनी खडसे यांच्या बंगल्यात चोरी केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Comments
Add Comment