राजस्थानमध्ये 'अँटी-नॅशनल' कारवायांचा पर्दाफाश! दोन धर्मोपदेशकांसह ५-६ संशयित ताब्यात

एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त धाड


जयपूर: राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्तचर विभागाने राजस्थानमधील जोधपूर, जैसलमेर आणि सांचोर येथील काही ठिकाणी छापे टाकून देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचा संशय असलेल्या ५-६ संशयितांना ताब्यात घेतले आहे.


सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा एजन्सीच्या या संयुक्त पथकांनी अचानक आणि एकाच वेळी अनेक ठिकाणी कारवाई केली. जोधपूरच्या चोखा परिसरातील एका मदरसामधून मौलवी अयुब याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दुसरा छापा जोधपूरपासून ६० किलोमीटर दूर असलेल्या पिपाड सिटीमध्ये टाकण्यात आला, जिथे उस्मान नावाच्या धर्मोपदेशकाला पकडण्यात आले.


अयुबकडून संशयास्पद ऑनलाइन कारवायांचे आणि परदेशी क्रमांकावरून आलेल्या फोन कॉलचे रेकॉर्ड सापडले, तर उस्मानकडून काही संवेदनशील कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. ते एखाद्या मोठ्या नेटवर्कशी किंवा विघातक संघटनेशी जोडलेले आहेत का, याबाबत तपास यंत्रणा अटक केलेल्या व्यक्तींची कसून चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

उद्यापासून बदलणार आधार कार्डबाबतचे नियम

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया १ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेटच्या नियमांमध्ये मोठे बदल

'शीशमहल' वाद आता पंजाबमध्ये!

केजरीवाल यांना 'चंदीगढचा आलिशान बंगला'! भाजपचा थेट आरोप; 'आप'ने फेक न्यूज म्हणून फेटाळले नवी दिल्ली/चंदीगढ:

फेब्रुवारी २०२६ ला विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाचा आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू सोहळा

नवी दिल्ली : भारतीय नौदल इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, फेब्रुवारी २०२६ मध्ये आंध्र प्रदेशातील

देशभरात साजरा करणार ‘आदिवासी गौरव वर्ष पंधरवडा’

नवी दिल्ली : आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्थेच्या