मुंंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या अर्धवट कामांना आता सुरुवात झाली असून पावसाळ्यापूर्वी बंद करण्यात आलेल्या ५७४ रस्त्यांपैंकी ४२५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. उर्वरीत सर्व अर्धवट कामांना लवकरच सुरुवात करून पुढील वर्षांत पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची कामे पूर्ण केली जातील. तसेच नवीन रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत ३१ मे २०२५ अखेर एकूण १३८५ रस्त्यांचे मिळून ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटकरण पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत, ७७१ रस्त्यांचे एकूण १८६ किलोमीटर लांबीचे काम १०० टक्के पूर्णत्वास गेले आहे. तर, ५७४ रस्त्यांवर चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदी पर्यंत याप्रमाणे मिळून एकूण १५६.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. हे सर्व रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत.
टप्पा १ अंतर्गत निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ६३.५३ टक्के तर, टप्पा २ अंतर्गत निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ३६.८४ टक्के लक्ष्यपूर्ती करण्यात आली आहे. त्यामुळे टप्पा १ आणि टप्पा २ असे एकत्रित मिळून पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी ४९.०७ इतकी आहे. मात्र, यातील काही कामे हाती घेण्यात आल्यानंतर पावसाळ्यानंतर कामे थांबवण्यात आली होती. ही सर्व अर्धवट कामे आता पावसाळ्यानंतर ऑक्टोबरपासून हाती घेण्यात आली आहेत.
मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha) चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक ...
रस्ते काँक्रिटीकरण(टप्पा १ व २)
१) रस्ते संख्या - २१२१
२) एकूण लांबी - ६९८.७३ किलोमीटर
काँक्रिट कामे पूर्ण
१) रस्ते संख्या - ७७१
२) एकूण लांबी - १८६.०० किलोमीटर
काँक्रिट कामे अंशत: पूर्ण
१) रस्ते संख्या - ५७४
२) एकूण लांबी - १५६.७४ किलोमीटर
सुरू होणारी काँक्रिट कामे
१) रस्ते संख्या - ७७६
२) एकूण लांबी - २०८.७० किलोमीटर





