नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल सामना मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतासमोर ३३९ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र याच्या प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारीतय संघातील स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद पाहायला मिळाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मंधाना चांगल्या लयीमध्ये दिसत होती. मात्र पावरप्लेच्या शेवटच्या षटकातील म्हणजेच १०व्या षटकांत किम गार्थच्या बॉलवर वाईड होता. मात्र विकेटच्या मागे उभे असलेल्या कर्णधार हीलीने कॅच आऊटचा जोरदार अपील केले. मैदानावर उभ्या असलेल्या अंपायरनी बाद देण्यास नकार दिला. हीलीने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला.
🤯🤯🤯🤯 BIG BLOW to INDIA! The ultra-edge showed a spike, but Smriti Mandhana reckons she did not knick that! 😕 Was it OUT? 🤔 OR NOT OUT? 👍🏻 CWC 25 Semi-Final 2, IND 🆚 AUS | LIVE NOW 👉 https://t.co/H6FmcwTyRj pic.twitter.com/LsxN0lhI36
— Star Sports (@StarSportsIndia) October 30, 2025
मंधाना याबाबत बिनधास्त होती. तिच्या बॉडी लॅग्वेंजवरून दिसत होते की बॉल तिच्या बॅटला लागलेला नाही. कमेंटेटरनीही आवाज आल्याचे नाकारले होते. मात्र अल्ट्रा एजवरून जेव्हा थर्ड अंपायरने कन्फर्म केले की त्यात दिसले मंधानाच्या बॉलचा आणि बॅटचा संपर्क झाला. मात्र बाद दिल्यानंतरही मंधानाने सांगितले की बॅटला बॉल लागलाच नाही.
थर्ड अंपायरच्या या निर्णयाने मैदानावर उभे असलेले अंपायरही चक्रावले. त्यांनी इशाऱ्याने सांगितले की बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. कमेंट्री बॉक्समध्ये असलेले लोकही या निर्णयाने हैराण झाले.






