मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज (Star Batsman) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या एका गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार घेत आहे. चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत असतानाच, श्रेयस अय्यरने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपल्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे. ही त्याची पहिलीच पोस्ट चाहत्यांसाठी मोठा दिलासा घेऊन आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे दरम्यान त्याच्या पोटाला जोरदार बॉल लागला होता. या गंभीर दुखापतीमुळे त्याच्या Spleen (प्लीहा) मध्ये कट झाला आणि अंतर्गत रक्तस्राव सुरू झाला. प्रकृती बिघडल्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारासाठी आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. या गंभीर घटनेनंतर श्रेयसने पहिल्यांदाच चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट लिहली असून, तो लवकरच क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची आशा त्याच्या चाहत्यांना मिळाली आहे.
७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या ...
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरची पहिली पोस्ट
गंभीर दुखापतीमुळे आयसीयूमध्ये दाखल असलेला टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे, तसेच चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. अय्यरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी सध्या रिकव्हरी प्रक्रियेत आहे आणि प्रत्येक दिवशी माझी प्रकृती आधीपेक्षा जास्त सुधारत आहे." त्याने पुढे लिहिले, "मला मिळालेल्या सर्व शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो." चाहत्यांच्या प्रार्थनांचे महत्त्व अधोरेखित करताना त्याने म्हटले, "माझ्यासाठी तुमच्या शुभेच्छा खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही माझ्यासाठी केलेल्या या प्रार्थनेबद्दल मी मनापासून आभारी आहे." अय्यरच्या या संदेशामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला असून, तो लवकरच पूर्णपणे बरा होऊन मैदानावर परतेल अशी आशा निर्माण झाली आहे.
BCCI कडून अधिकृत हेल्थ अपडेट
टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने (BCCI) अधिकृत प्रेस रिलीज जारी करत सविस्तर माहिती दिली आहे. बीसीसीआयने स्पष्ट केले की, "श्रेयस अय्यरला २५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे दरम्यान पोटावर बॉल लागून दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला अंतर्गत रक्तस्राव झाला." बीसीसीआयच्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. २८ ऑक्टोबर रोजी केलेल्या स्कॅनमध्ये त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून आली असून, तो आता बरा होण्याच्या मार्गावर आहे. वैद्यकीय पथक (Medical Team) त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. बीसीसीआयच्या या अपडेटमुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.






