बंगळुरूतील धक्कादायक घटना, जोडप्याने भरधाव वेगाने पाठलाग केला आणि...


बंगळुरू : कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या एका कारला एका बाईकने धडक दिली. धडक देणाऱ्या बाईकवर दोन जण बसले होते. अपघात झाल्याचे लक्षात येताच बाईकवर बसलेले दोघेजण घटनास्थळावरुन बाईकसह वेगाने पसार झाले. या प्रकारामुळे कारचालक आणि त्याची पत्नी संतापली. यानंतर जोडप्याने भरधाव वेगाने कार चालवत बाईकवरुन पसार झालेल्यांना शोधले आणि त्यांचा वेगाने पाठलाग सुरू केला. तब्बल दोन किमी. पर्यंत पाठलाग केल्यानंतर कारने बाईकला जोरदार धडक दिली. यानंतर कार घटनास्थळावरुन सुसाट वेगाने निघून गेली. या घटनेत बाईकस्वाराचा मृत्यू झाला आणि बाईकवर मागे बसलेली व्यक्ती जखमी झाली. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.


बाईकला धडक मारुन पसार झालेल्या कारचा पोलिसांनी शोध घेतला. यानंतर पोलिसांनी बाईकला धडक मारल्याप्रकरणी मनोज कुमार आणि त्याची पत्नी आरती शर्मा या दोघांना अटक केली. मनोज आणि आरती ज्या कारमध्ये बसले होते त्याच कारने बाईकला धडक दिली. यानंतर कार पसार झाली. अपघातात बाईकस्वार दर्शनचा मृत्यू झाला आणि बाईकवर मागे बसलेला वरुण जखमी झाला. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११:३० वाजता श्रीराम लेआउटजवळ घडली, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात जप्त केलेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.


कारचा साइड मिरर बाईकला धडकल्याने बाईकस्वार आणि कार चालक यांच्यात किरकोळ वाद झाला. यानंतर बाईकस्वार दर्शन घटनास्थळावरुन निघून गेला. पण कार चालकाने बाईकचा पाठलाग केला आणि एका टप्प्यावर बाईकला जोराची धडक दिली. या अपघातात बाईकवर बसलेले दोघे रस्त्यावर जोरात फेकले गेले. रस्त्यावर जोरात पडल्यामुळे बाईकस्वार दर्शनचा मृत्यू झाला आणि बाईकवर मागे बसलेला वरुण जखमी झाला. बाईकला जोरदार धडक दिल्यानंतर मनोज कार घेऊन वेगाने पसार झाला होता.


सीसीटीव्ही फूटेज बघितल्यावर पोलिसांना एक धक्कादायक प्रकार समजला. कारमधील जोडप्याला पहिल्या प्रयत्नात दुचाकीस्वार दिसले नाहीत. त्यांनी यू-टर्न घेतला आणि नंतर त्यांना पुन्हा धडक दिली. गुन्हा केल्यानंतर, ते घटनास्थळावरून पळून गेले. शिवाय, ते नंतर मास्क घालून परतले, घटनास्थळावरून तुटलेले कारचे भाग उचलले आणि पुन्हा पळून गेले होते. या प्रकरणात पुढील पोलीस कारवाई सुरू आहे.


Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव