Thursday, October 30, 2025
Happy Diwali

सरकारी रुग्णालयात आता रोज वेगळ्या रंगांच्या चादरी

सरकारी रुग्णालयात आता रोज वेगळ्या रंगांच्या चादरी

सुरक्षित उपचार, स्वच्छतेचा नवा आराखडा तयार

मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयात स्वच्छतेच्या दृष्टीने रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी तसेच संक्रमणजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी आता रुग्णालयांमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांच्या बेडशीट्सचा वापर केला जाणार आहे. यामुळे वापर झालेली बेडशीट लगेच ओळखता येणार असून, रुग्णालयातील स्वच्छतेचे निरीक्षण सोपे होणार आहे. या योजनेंतर्गत सोमवारी आणि गुरुवारी पांढरी, मंगळवारी आणि शुक्रवारी हिरवी तर बुधवारी आणि शनिवारी गुलाबी रंगाची बेडशीट वापरली जाणार आहे. रंगानुसार नोंदी ठेवल्याने जुन्या व नवीन बेडशीटची ओळख त्वरित होईल. त्यामुळे पुनर्वापर किंवा दुर्लक्ष होण्याची शक्यता टळेल. त्यामुळे रुग्णाला होणार संसर्ग टाळण्यास मदत मिळणार आहे.

कुठल्या दिवशी बेडशीटचा कोणता रंग?

पांढरा : सोमवार व गुरुवार हिरवा : मंगळवार व शुक्रवार गुलाबी : बुधवार व शनिवार

संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाचा नवा उपक्रम

मानवी हस्तक्षेपाशिवाय कपडे धुतले जाणार!

मानवी हस्तक्षेपाशिवाय रुग्णालयातील सर्व कपडे यांत्रिक पद्धतीने धुतले जाणार आहेत. या पद्धतीमुळे स्वच्छता सुनिश्चित होईल. रुग्णांसाठी सुरक्षित वातावरण तयार होईल. तसेच संसर्गजन्य घटकांचा धोका आणखी कमी होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा सर्वत्र स्वागत होत आहे. रुग्णालयातील बेडशीट, उशांचे कव्हर, ब्लँकेट, पडदे, गणवेश, टॉवेल इत्यादी वस्त्रांची पूर्णतः यांत्रिक पद्धतीने निर्जतुक धुलाई केली जाणार आहे. रंगानुसार नोंदी ठेवल्याने जुन्या व नवीन बेडशीटची ओळख त्वरित होईल. त्यामुळे पुनर्वापर किंवा दुर्लक्ष होण्याची शक्यता टळणार आहे. प्रवाशांना त्याचा फायदा होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा