मुंबई: सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन, भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन वाहिन्यांपैकी एक असून पुन्हा एकदा संगीताचा अनोखा उत्सव म्हणजे इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट! हा कार्यक्रम घेऊन आले आहे. या नव्या हंगामात ९०च्या दशकातील सुवर्णकाळ पुन्हा जिवंत करण्यात आला आहे. जिथे जुन्या आठवणींना नव्या सुरांचा स्पर्श दिला जात आहे. देशभरातील उत्कृष्ट गायक-गायिकांना मंच देणारा इंडियन आयडॉल यंदा परीक्षकांच्या खास तिकडीसह परतला आहे. ज्यात श्रेया घोषाल, विशाल ददलानी आणि बादशाह यांचा समावेश आहे. या स्पर्धेत देशभरातून आलेले स्पर्धक आपल्या गायनाने प्रेक्षकांची मने जिंकत असल्याने हा हंगाम संगीत, आठवणी आणि भावना यांचा उत्सव बनला आहे.
इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट हा कार्यक्रम केवळ प्रेक्षकांच्या मनातच नाही, तर मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनाही भावत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदळकर आणि नम्रता संभेराव यांनीही या हंगामाच्या संकल्पनेचे कौतुक केले असून, त्यांच्या 'यादों की प्लेलिस्ट' मधील खास गाणी प्रेक्षकांसोबत शेअर केली आहेत.
प्रियदर्शिनी इंदळकर म्हणाली, “माझ्या ‘यादों की प्लेलिस्ट’ मध्ये 'राब्ता’ हे गाणं आहे . जे एखाद्या व्यक्तीची नाही, पण आयुष्यातील प्रेमाची आठवण नक्की करून देतं.”
तर नम्रता संभेराव ने सांगितले की, “माझ्या ‘यादों की प्लेलिस्ट’ मध्ये ‘दिल दीवाना बिन सजना के’ हे गाणे आहे. जे मी नेहमी माझ्या नवऱ्यासाठी गाते. आणि खरं सांगायचं तर, ते त्याचे आवडते गाणे आहे.”View this post on Instagram
या दोन्ही प्रसिद्ध मराठी कलाकारांकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादामुळे इंडियन आयडॉल चा वारसा किती चिरंतन आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. यादों की प्लेलिस्ट हा नवा हंगाम प्रेक्षकांच्या तसेच मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या मनातही स्थान मिळवतो आहे.View this post on Instagram






