Thursday, November 20, 2025

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. लीग टप्प्यात भारताचा शेवटचा सामनाही याच मैदानावर होता जो पावसामुळे रद्द झाला होता. जर आजची सेमी फायनलची मॅच पावसामुळे रद्द झालंली तर फायनलमध्ये कोणत्या संघाला एन्ट्री मिळणार जाणून घेण्यासाठी आधी नियम समजून घेऊ.

मोंथा चक्रीवादळचा तडाखा हा भारताच्या पूर्व किनापट्टीवर पाहायला मिळतोय आणि त्यामुळे भारतात ठिकठिकाणी पाऊसही पडतोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३० ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी सकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि दिवसभर ढगाळ वातावरण राहील. मात्र गेल्या आठवड्यात आपण पहिले की अनेकवेळा पावसामुळे खेळात व्यत्यय येऊन सामने रद्द झाले आहेत. त्यामुळे जर पुन्हा गुरुवारी पावसामुळे खेळ रद्द झाला तर काय होईल याची चिंता क्रिकेटप्रेमींना लागून राहिली आहे.

सेमी फायनलसाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर सामना ३० ऑक्टोबरला होऊ शकला नाही. तर तो ३१ ऑक्टोबरला खेळवला जाईल. जर राखीव दिवशीही पावसामुळे सामना रद्द झाला तर ऑस्ट्रेलियाला लीग टप्प्यातील गुणतालिकेनुसार अंतिम फेरीचे तिकीट मिळेल.

ऑस्ट्रेलियाने लीग टप्प्यत चांगली कामगिरी केली आहे. पावसामुळे सेमी फायनल झालीच नाही तर ऑस्ट्रेलियाला फायदा होऊ शकतो. भारतीय संघाला मात्र फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवणे हाच एकमेव पर्याय आहे.

Comments
Add Comment