नाशिक: सुरतहून शिर्डीच्या साईबाबांचे दर्शना घेण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला केला. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास फॉर्च्युनर या चारचाकी वाहनाने शिर्डीला येत असताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा अपघात एरंडगाव शिवारात नाशिक महामार्गावर झाला असून यात तिघांचा जागीच मृत्यू तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातातील मृत व्यक्तींमध्ये प्रणव अनुरभाई देसाई (वय ४०), पलक अजयभाई कपाडिया (वय ३५), सुरेशचंद्र कबीराज साहू (वय ३५) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये विष्णू मनोजकुमार छकवाला (वय २८), बिपीन नवीनचंद्र राणा (वय ४९), सागर निपुण शहा (वय ३०), विक्रम महेंद्रभाई उसवाल (वय ४२) यांचा समावेश आहे. अपघातातील सर्व व्यक्ती गुजरातच्या सुरत शहरात स्थायिक आहेत. सध्या जखमींवर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha) चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक ...
या प्रकरणी तालुका पोलिसांत नीरज अशोककुमार कापडिया (रा. जदाखाडी मैधरपुरा, सुरत) यांच्या फिर्यादीवरून चालक सागर निपुण शाह याच्याविरुद्ध भरधाव वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक करीत आहेत.






