Thursday, October 30, 2025
Happy Diwali

अमेरिका करणार अणवस्त्रांची चाचणी, रशियाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा मोठा निर्णय!

अमेरिका करणार अणवस्त्रांची चाचणी, रशियाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा मोठा निर्णय!

अमेरिका: रशियाने नुकतेच 'पोसायडन' नावाच्या आण्विक-शक्तीवर चालणाऱ्या अंडरवॉटर ड्रोनची चाचणी यशस्वी केल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. जगातील वाढत्या आण्विक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांनी पेंटागॉनला अमेरिकेच्या अण्वस्त्रांची चाचणी तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय शस्त्र नियंत्रण करारांवर याचे मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प सध्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अणवस्त्रांबद्दल मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, अमेरिकेकडे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. माझ्या पहिल्या कार्यकाळात विद्यमान शस्त्रांचे संपूर्ण अद्ययावतीकरण आणि नूतनीकरण साध्य झाले. प्रचंड विध्वंसक शक्तीमुळे, मला ते करण्याचा तिरस्कार वाटला, पण पर्याय नव्हता! अणवस्त्रांच्या स्पर्धेत रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. इतर देशांच्या चाचणी कार्यक्रमांमुळे, मी युद्ध विभागाला समान आधारावर आपल्या अण्वस्त्रांची चाचणी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ती प्रक्रिया त्वरित सुरू होईल. या पोस्टमध्ये त्यांनी रशियाचे नाव न घेता अणवस्त्रांबद्दल सक्रिय झाल्याचे स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >