Thursday, November 20, 2025

वायंगणी कांबळीवाडी समुद्रकिनारी कुजलेल्या अवस्थेत आढळला भला मोठा व्हेल मासा...

वायंगणी कांबळीवाडी समुद्रकिनारी कुजलेल्या अवस्थेत आढळला भला मोठा व्हेल मासा...

वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी कांबळीवाडी समुद्रकिनारी आज सकाळी भला मोठा व्हेल मासा कुजलेल्या अवस्थेत किनाऱ्याला लागला आहे. सुमारे ३० ते ४० फूट लांबीचा हा मासा असून त्याचा बराच भाग कुजून गेला आहे. सध्या सुरू असलेल्या वादळामुळे हा मासा वाहत किनाऱ्यावर आल्याची प्राथमिक माहिती आहे.

समुद्रामध्ये काही दिवसांपूर्वी मेलेला हा व्हेल मासा समुद्राच्या लाटांबरोबर पुढे पुढे सरकत आज सकाळी वायंगणी कांबळेवाडी येथील समुद्र किनाऱ्याला लागला आहे. याबाबत कासव मित्र सुहास तोरस्कर यांनी माहिती दिली. त्यांनी या माशाबाबत कांदळवन विभाग व वनविभाग यांना कळविले आहे. सरकारी अधिकारी आल्यानंतर पुढील सोपस्कार पूर्ण करण्यात येणार आहे. कोंडुरा समुद्र किनाऱ्यावर ही काल असाच मासा आढळून आला होता.

Comments
Add Comment