मुंबई: 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी म्हणजे योगिता आणि समीर चौगुले यांनी एक वर्षापूर्वी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली होती.मात्र आता त्यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले असून सोशल मीडीयावरील एकमेकांसोबतचे सर्व फोटो डिलिट केल्यामुळे ते दोघे विभक्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
योगिता आणि सौरभ यांची पहिली भेट 'जीव माझा गुंतला' या मालिकेच्या सेटवर झाली होती. मालिकेत एकत्र काम करताना त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. यानंतर 'जीव माझा गुंतला' ही मालिका संपल्यानंतर दोघांनी मार्च २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली.
अहमदाबाद: अहमदाबादमधील एका टेलरला लग्नाच्या कार्यक्रमासाठी वेळेत ब्लाउज शिवून न दिल्याबद्दल मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. नवरंगपुरा येथील ...
लग्नाच्या दोन महिन्यांनंतर त्यांनी मुंबईमध्ये स्वत:चे घर घेतले होते. ज्याबद्दल योगिता आणि सौरभने सोशल मीडियावर नव्या घरात गृहप्रवेश करतानाचे फोटो शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली होती. यावेळी सौरभने फोटोस् खाली कॅप्शन दिला होता,'एक स्वप्न आपलं, एकत्र पूर्ण करूया. नवीन शहरात, नवीन संसार थाटूया'. मात्र काही दिवसातच त्यांच्यातील दुरावा वाढला असल्याच्या चर्चा होत आहेत.