चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पश्चात शिवसेना ही 'शिवसेना राहिली नाही' असे विधान त्यांनी केले, तसेच आदित्य ठाकरे यांनाही लक्ष्य केले.
View this post on Instagram
नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
चिपळूण येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेतील आपल्या जुन्या कार्यकाळाचा उल्लेख केला आणि उद्धव ठाकरे गटावर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, "मी १५ व्या वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ३९ ते ४० वर्षं शिवसेनेत काम केलं. बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती. बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही." एका पत्रकाराने आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केल्यानंतर, राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. "कोण आदित्य ठाकरे? काय आहे त्याचा? आमदार सामिक (सामान्य कार्यकर्ता) का सांग ना?" असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले.
साओ पावलो, ब्राझील : एक काळ असा होता जेव्हा मुंबईत अंडरवर्ल्डची मोठी दहशत होती. ही दहशत मोडून काढण्यासाठी प्रदीप शर्मा, दया नायक, विजय साळसकर यांसारख्या ...
राणे यांनी ठाकरे गटाच्या राजकीय कामावर टीका करताना म्हटले, "पाच पैशाचं काम नाही आणि ते टीव्ही आणि चॅनलवर अख्खा श्री ठाकरे कुटुंब एकवटलं. आपल्या घरीच जातात ना ते लोकं (बातम्या दाखवणारे)? काय दाखवता ते मातोश्रीवर राज ठाकरे गेले, हे (उद्धव ठाकरे) त्यांच्याशी... दुसरे काय? लाखो लोक इथे त्यांची कामं आहेत. विचार ना तू मला! एक नाही कुठलंही विचार."
'ठाकरेंशी संबंधित प्रश्नांना उत्तर देणार नाही'
यावेळी राणे यांनी स्पष्ट केले की, ठाकरे कुटुंबियांशी संबंधित कोणत्याही प्रश्नाला आपण यापुढे उत्तर देणार नाही. "मी मला त्या ठाकरेंच्या संबंधी एकाही प्रश्नाला मी उत्तर देणार नाही," असे त्यांनी ठणकावून सांगितले. नारायण राणे यांच्या या वक्तव्यामुळे कोकणसह राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शिउबाठा आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.






