ट्रम्प यांच्या मध्यस्थी नंतरही शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन
Gaza war : गाझा पट्टीमध्ये रात्री झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान १०४ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, त्यात ४६ मुले आणि २० महिला आहेत. या हल्ल्यांमध्ये २५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. हा हल्ला रफाहमध्ये कथित शस्त्रसंधी उल्लंघनाच्या प्रत्युत्तरात करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे, तर हमासने या आरोपांचे खंडन करत इस्रायलने शस्त्रसंधी करार मोडल्याचा आरोप केला आहे.
इस्रायलच्या लष्करानुसार, हमासच्या अतिरेक्यांनी त्यांच्या सैन्यावर टँकविरोधी क्षेपणास्त्र आणि स्नायपर च्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात एक इस्रायली सैनिक ठार झाला. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हल्ल्यास प्रत्यत्तर देत गाझा ओलांडून कठोर हल्ल्यांचे आदेश दिले. यानंतर आयडीएफने काही तासांतच ३० हमास कमांडर्स ठार झाल्याचे वृत्त समोर आले.
मिळलेल्या माहितीनुसार, हमास मृत इस्रायली सैनिकाचा मृतदेह परत करण्यास तयार होते, परंतु इस्रायली हल्ल्यांमुळे हे हस्तांतरण पुढे ढकलण्यात आले. या घटनेनंतर हमासने मध्यस्थांना इस्रायलवर युद्धबंदीचे पालन करण्यासाठी दबाव आणण्याचे आवाहन केले आहे.
हा युद्धबंदी करार अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीत झाला होता, परंतु या नव्या संघर्षामुळे कराराची नाजूकता पुन्हा उघड झाली आहे. हल्ल्यांमुळे गाझा पट्टीतील नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होत असून, मानवीय संकट अधिक गंभीर झाले आहे.
सीजफायरनंतर इस्रायलने हा मोठा हवाई हल्ला झाला, ज्यामुळे युद्धबंदीचे पालन आणि लोकांच्या सुरक्षिततेसंबंधी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेमुळे गाझा पट्टीतील नागरिकांची परिस्थिती अधिक चिंताजनक झाली आहे.






