महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातल्या आरोपीने लपवलेल्या मोबाईलमध्ये मिळाला मृत्यूपूर्वीचा 'तो' फोटो...

फलटण: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टरने स्वतः लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी फोटो संशयित आरोपी प्रशांत बनकर याला पाठविल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकरसोबत व्हॉट्सअॅपवर संवाद साधला होता. त्याच दरम्यान तिने तो सेल्फी पाठवला होता. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याची सखोल डिजिटल तपासणी केली असता हा फोटो उघडकीस आला. गुप्त सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे.


दरम्यान,व्हॉट्सअॅप चॅट्स डिलीट झाल्याचा आरोप डॉक्टर तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी सांगितले की, मिळालेल्या सर्व डिजिटल पुराव्यांची तपासणी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने सुरू आहे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


फलटण येथील या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध ठिकाणी नागरिक आणि वैद्यकीय कर्मचारी महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी आंदोलनं आणि मोर्चे काढत आहेत.


मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहिली होती. त्या नोटमध्ये तिने पोलिस अधिकारी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरवर लैंगिक तसेच मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेत. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत घोटाळा! सर्वसामान्यांच्या बचतीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला फायदा

अकोला: अकोल्यातली ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक

Leopard Conflict : 'गोळी' की 'नसबंदी'? बिबट्याला पकडण्यासाठी सरकारचा मास्टरस्ट्रोक! तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च करणार अन्...

जुन्नर : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junner) आणि उत्तर पुणे परिसरात बिबट्यांच्या (Leopard) संख्येत सातत्याने वाढ होत आहे,

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी

Nashik Malegaon Crime News : सूडापोटी 'सैतानी कृत्य'! ३ वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण करून डोकं दगडाने ठेचून...गांभीर्याने तपास सुरू

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हादरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे.

Ahilyanagar News : बिबट्याच्या भीतीने शाळांच्या वेळेत तातडीने बदल! अहिल्यानगर-पुण्यातील तालुक्यांत पहिली ते चौथीसाठी वेगळी, तर माध्यमिकसाठी वेगळी वेळ जाहीर

अहिल्यानगर : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक

कडाक्याच्या थंडीत पुणे पालिकेची शेकोटीवर बंदी! प्रदुषण नियंत्रणासाठी घेतला निर्णय

पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी