Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

Maharashtra Local Body Election : १० नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होणार? मोठी अपडेट आली समोर

Maharashtra Local Body Election : १० नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होणार? मोठी अपडेट आली समोर

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या पाच ते सात वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका अखेर नोव्हेंबर २०२५ मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी १० नोव्हेंबरपूर्वी राज्यभर आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू होण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) लवकरच काढली जाणार आहे.

राज्यात अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन करण्यासाठी आयोगाने निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध महानगरपालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे कामकाज पाहता, आयोगाकडून या निवडणुका दोन टप्प्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राज्यातील कोट्यवधी मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा