आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे विभागातील २८ गावांमधील हजारो हेक्टर आकारीपड जमिनीचा ताबा अनेक वर्षांपूर्वी शासनाने घेतला होता, ती जमीन आता पुन्हा स्थानिक शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हा निर्णय कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील स्थानिक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे आणि हे त्यांच्या कष्टाचं, संघर्षाचं फळ आहे, यासाठी कुडाळ मालवणचे आमदार सन्माननीय निलेश राणे यांनी महाराष्ट्र सरकार सोबत पाठपुरावा करून माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे मनःपूर्वक आभार तसेच माणगाव खोऱ्यातील सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.






