बिहार: बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडण्यात येत आहेत. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दरभंगा येथे एका सभेत बोलताना विरोधकांना खोचक टोला मारला आहे. यावेळी ते म्हणाले, "बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव हे त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी ह्या त्यांच्या मुलाला देशाचा पंतप्रधान बनवू इच्छित आहेत. पण ही दोन्हीही पदे रिक्त नाहीत." त्यामुळे विरोधकांना सरळ शब्दात उत्तर मिळाले आहे.
बिहारमध्ये ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या बिहारमध्ये निवडणूकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. याकरता अनेक दिग्गज नेते मंडळी बिहारच्या विविध शहरात जाऊन सभा, रॅली आणि बैठका घेत आहेत. दरम्यान आज दरबंगा येथे प्रचारार्थ गेलेल्या अमित शाहांनी सभेत बोलताना लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत एका दगडात चार पक्षी मारले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या पाच ते सात ...






