नागपूर: मासेमारीचा करारनामा संस्थेने रद्द का केला? या प्रकरणी चौकशी करण्यात यावी म्हणून अर्ज केलेल्या तक्रारदाराकडून लाच मागणाऱ्या सहायक निबंधकाला रंगेहात पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश मिळाले आहे. नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यासाठी सापळा रचत लाचखोर सहायक निबंधकाला पकडले आहे. सुदाम लक्ष्मण रोकडे असे लाचेची मागणी करणाऱ्या सहायक निबंधकाचे नाव असून ते सहकारी संस्था गोंदिया तथा अतिरीक्त प्रभार सहकारी संस्था (दुग्ध व मत्स्य) भंडारा येथे सहायक निबंधक या पदावर कार्यरत होते.
तक्रारदार यांचा मासेमारी व्यवसाय आहे. यासाठी त्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईटीयाडोह जलाशय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेसोबत मासे खरेदी आणि विक्रीचा करारनामा केला. या करारनाम्याचा कालावधी २०२३ ते २०२७ दरम्यानचा आहे. मात्र काही कारणास्तव संस्थेने त्यांचा करारनामा मुदतपुर्व रद्द केला. याबाबत तक्रारदार यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था दुग्ध व मत्स्य भंडारा यांच्याकडे चौकशीसाठी तक्रार केली. यावेळी सहायक निबंधक सुदाम लक्ष्मण रोकडे यांनी चौकशीसाठी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची मागणी केली.
आता वादळाचा प्रवास ओडिशाच्या दिशेने अमरावती : ‘मोंथा’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकून ओडिशाच्या दिशेने सरकले असून, त्यामुळे 15 ...
सहायक निबंधकाने लाच मागितल्यामुळे तक्रारदाराने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुरच्या पथकाने ९ ऑक्टोबर, १६ ऑक्टोबर व २७ ऑक्टोबर २०२५ रोजी केलेल्या सापळा पडताळणी दरम्यान सुदाम रोकडे यांनी लाचेच्या रकमेचा पहिला हफ्ता स्वीकारण्याची तयार दाखवली. मात्र २८ ऑक्टोबर रोजी सहायक निबंधकाला सापळा रचल्याचा संशय आल्याने त्यांनी लाच स्विकारली नाही.
याप्रकरणी सदर लोकसेवक यांनी आपले पदाचा दुरुपयोग करुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लाच रक्कमेची मागणी केल्याने त्यांच्या विरुध्द गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनीयम १९८८ (संशोधन-२०१८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईमध्ये पोलीस उपअधिक्षक अनिल जिट्टावार, पोलिस निरीक्षक जितेंद्र वैरागडे,राजकिरण येवले आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.






