Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध केले आहे. सात महिन्यांची गर्भवती असूनही सोनिकाने वेटलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय यशस्वी कामगिरी केली आहे. तिचा तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही स्पर्धा जिंकून तिने अनेकांना प्रेरणा दिली आहे.

ऑल इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा २०२५ - २०२६ ही स्पर्धा आंध्र प्रदेशात आयोजित करण्यात आली होती. ती सात महिन्यांची गर्भवती असूनही तिने १४५ किलोग्रॅम वजन उचलून वेटलिफ्टिंग मध्ये कांस्यपदक जिंकले आहे. जेव्हा सोनिकाने चॅम्पियन शिप स्टेजवर पाऊल ठेवले तेव्हा कोणीही तिच्या या कामगिरीचा अंदाज लावू शकत नव्हते. पण जेव्हा तिने १४५ किलोग्रॅम वजन उचलले तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले.

या स्पर्धेत सोनियाने १२५ किलो स्क्वॅट केले. ८० किलो बेंच प्रेस केले आणि १४५ किलो डेडलिफ्ट केले. ती म्हणते की तिने इंटरनेटवर थोडा शोध घेतला आणि लुसी मार्टीन्स नावाच्या महिलेने तिच्या गरोदरपणात वेटलिफ्टिंग केले होते. त्यानंतर सोनियाने इंस्टाग्रामवर लुसीशी संपर्क साधला आणि प्रशिक्षण टिप्स विचारल्या.

तिच्या सैल कपड्यांमुळे ती गर्भवती असल्याचे कोणालाही लक्षात आले नव्हते. बेंच प्रेसनंतर जेव्हा तिच्या पतीने तिला उठण्यास मदत केली तेव्हा संपूर्ण स्टेडियम मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

सोनिकाच्या पतीने एका मुलाखतीत सांगितले "सोनिकाला मे महिन्यात कळले की ती गर्भवती आहे. मला वाटले होते की ती जिम यामध्ये जाणे किंवा प्रशिक्षण थांबवेल पण तिने तस न करता ट्रेनिंग चालू ठेवली. थांबणार नाही असा दृढनिश्चय तिने केला होता. आणि याच धाडसामुळे तिने आज कांस्यपदक जिंकले आहे".

Comments
Add Comment