Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात रोज काही-न्-काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणात पोलिसांशी चर्चा केल्यानंतर धक्कादायक माहिती दिली आहे.

आत्महत्या करणारी २८ वर्षीय डॉक्टर तरुणी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आरोपी प्रशांत बनकरच्या घरी गेली होती. त्या दिवशी फोटो काढण्यावरुन डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकर यांच्यात वाद झाला. यानंतर डॉक्टर तरुणी घरातून बाहेर पडली.

डॉक्टर तरुणीच्या कॉल रेकॉर्डमध्ये काय आढळले?

पोलिसांनी आत्महत्या करणारी डॉक्टर तरुणी तसेच आरोपी पीएसआय गोपाल बदने आणि आरोपी प्रशांत बनकर या तीन जणांच्या फोनचे सीडीआर काढले आहेत. यातून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. जानेवारी ते मार्च या काळात डॉक्टर तरुणी गोपाळ बदनेच्या संपर्कात होती नंतर ती प्रशांत बनकरच्या संपर्कात होती. पोलीस आता जानेवारी ते मार्च काळातील डॉक्टर तरुणी आणि पीएसआय गोपाल बदने या दोघांची लोकेशन जाणून घेत आहेत. दोघे कधी एकत्र एकाच लोकेशनवर होते का याचाही तपास केला जाणार आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रशांत बनकर आणि महिला डॉक्टरमध्ये काय घडले ?

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी प्रशांत बनकरच्या घरी गेली होती. तिथेच डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकर यांच्यात फोटा काढण्यावरुन वाद झाला. यानंतर डॉक्टर तरुणी बनकरच्या घरातून बाहेर पडली. बनकरच्या वडिलांनी डॉक्टर तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टर तरुणी थोड्या वेळाने निघून गेली.

महिला डॉक्टरांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधील माहिती

वाद झाल्यानंतर मी कठोर पाऊल उचलेन अशी धमकी देणारा संदेश डॉक्टर तरुणीने बनकरला केला होता. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन हॉटेलच्या रुमवर आत्महत्या केली. या प्रकरणात अन्य कोणत्या व्यक्तीचा समावेश आहे की नाही, याबाबतही पोलीस चौकशी करत असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दोन जणांना अटक

सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रशांत बनकर आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने या दोघांना डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कोठडी देण्यात आली आहे. डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्याआधी हातावर प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाल बदने यांच्यावर आरोप करणारा छोटा मजकूर लिहिला होता. तसेच एक चार पानांचे पत्र पण लिहून ठेवले होते. या अखेरच्या संदेशांद्वारे डॉक्टर तरुणीने गोपाल बदनेवर बलात्काराचा तर प्रशांत बनकरवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >