मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. मजबूत तेजी आजही कायम राहिल्याने विशेषतः छोट्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत सुधारणा दिसून आली. सेन्सेक्स १८७.३८ अंकांनी व निफ्टी ६९.२० अंकांनी वाढला आहे. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीत सलग दुसऱ्यांदा तेजी प्राप्त झाल्यानंतर आज रॅली दिसून येत आहे. विशेषतः आज स्मॉलकॅप शेअर्समध्ये अधिक वाढ झालेली दिसून येते. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ पीएसयु बँक (१.०२%), मिडिया (१.०२%), मेटल (०.७२%) निर्देशांकात झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकातील सर्वाधिक वाढ स्मॉलकॅप १०० (०.३७%), निफ्टी १०० (०.२४%), निफ्टी ५०० (०.२५%) निर्देशांकात झाली आहे.
आज सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ अपोलो टायर्स (४.५०%), जेके टायर्स (३.६४%), ईआयडी पेरी (३.४२%), इंडियन बँक (३.२६%), इंडस टॉवर (३.२५%), कल्पतरू प्रोजेक्ट (३.०१%), नेटवेब टेक्नॉलॉजी (२.९२%), पीव्हीआर आयनॉक्स (२.८७%), एथर एनर्जी (२.८५%), बँक ऑफ महाराष्ट्र (२.८६%), माझगाव डॉक (२.३३%), युको बँक (२.३८%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (२.१३%), आयडीबीआय बँक (१.९३%) समभागात झाली आहे.
आज सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण बाटा इंडिया (५.५१%), सुप्रीम इंडस्ट्रीज (३.८५%), चालेट हॉटेल (१.९५), टीबीओ टेक (१.६१%), वारी एनर्जीज (१.१६%), सिग्नेचर ग्लोबल (१.१५%), हिन्दुस्तान झिंक (१.०८%), एमसीएक्स (१.०३%),आयसीआयसीआय बँक (१.०२%),व्होल्टास (१%), आयसीआयसीआय बँक (१.०२%), आनंद राठी वेल्थ (०.९४%), टाटा कम्युनिकेशन (०.९२%), एसबीआय कार्ड (०.९१%), ओबेरॉय रिअल्टी (०.९०%), वेलस्पून लिविंग (०.९०%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (०.७२%)समभागात झाली आहे.






