Wednesday, November 19, 2025

१४२ दिवसांच्या योगनिद्रेनंतर जागे होतील श्री हरी विष्णू; 'या' राशींसाठी आहे अत्यंत शुभ काळ!

१४२ दिवसांच्या योगनिद्रेनंतर जागे होतील श्री हरी विष्णू; 'या' राशींसाठी आहे अत्यंत शुभ काळ!

मुंबई : हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाणारी देवउठनी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी लवकरच येत आहे. या दिवशी सृष्टीचे पालनकर्ता मानले जाणारे भगवान विष्णू तब्बल १४२ दिवसांच्या (चार महिन्यांच्या) योगनिद्रेतून जागे होतात. याच दिवसापासून विवाह, मुंडन, गृहप्रवेश अशा सर्व शुभ कार्यांची पुन्हा एकदा सुरुवात होते.

आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो, ज्यामध्ये भगवान विष्णू पाताळ लोकात राजा बळीच्या दारात विश्रांती घेतात. देवउठनी एकादशीला भगवान विष्णू जागे होतात आणि चातुर्मास समाप्त होतो. भगवान विष्णूंच्या जागृतीने सृष्टीत शुभ कार्यांचे आरंभ होते. या दिवसापासून थांबलेले विवाह, गृहप्रवेश आणि इतर मंगल कार्यांना सुरुवात होते. त्यामुळे या दिवसाला तुळशी विवाह म्हणूनही विशेष महत्त्व आहे, जो या एकादशीला किंवा त्यानंतर साजरा केला जातो.

या दिवशी विष्णू भक्त उपवास करतात आणि त्यांची विशेष पूजा करतात. घरामध्ये तुळशी वृंदावन सजवून श्री विष्णूंचे आगमन आणि तुळशी विवाहाचा सोहळा केला जातो.

या राशींसाठी एकादशी आहे अत्यंत शुभ

मेष

मेष राशींच्या व्यक्तींसाठी आर्थिक लाभाचे योग आहेत. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. श्री हरिंच्या आशीर्वादाने एखादी आनंदाची वार्ता तुमच्या जीवनात प्रवेश करू शकते. आनंदाने भरलेले दिवस सुरू होणार आहेत.

कर्क

कर्क राशींच्या व्यक्तींसाठी व्यापारात प्रगतीचे नवे संकेत मिळत आहेत. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक दृष्टीने अतिशय अनुकूल काळ आहे. तुम्ही एखाद्या नव्या प्रोजेक्टची सुरूवात करू शकता. सोबतच तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल.

वृश्चिक

देवउठनी एकादशीपासून वृश्चिक राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगती तसेच मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी शुभ वेळ आहे. आर्थिकरित्या स्थिती अधिक स्थिर आणि सशक्त बनेल.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आनंदाचा काळ आहे. प्रयत्न यशस्वी होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात सामंजस्य आणि प्रेम वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा कालावझी प्रगती आणि यशाचा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >