Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

गुंतवणूकदारांना फटका ! एमसीएक्स कमोडिटी बाजारात तांत्रिक बिघाड १०.३० पासून व्यवहार सुरळीत होणार 

गुंतवणूकदारांना फटका ! एमसीएक्स कमोडिटी बाजारात तांत्रिक बिघाड १०.३० पासून व्यवहार सुरळीत होणार 

प्रतिनिधी:मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) व्यवहारात तांत्रिक बिघाड झाला आहे. मात्र एक्सचेंज व्यवहार १०.३० वाजता पुन्हा सुरळीत होणार असल्याचे स्पष्ट केले. आज मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी तांत्रिक बिघाडामुळे गुंतवणूकदारांचे व्यवहार आता सकाळी १०:३० पर्यंत पुढे ढकलले. कमोडिटी बाजार एमसीएक्सने दिलेल्या माहितीपत्रकानुसार, सुरुवातीला व्यवहार सकाळी ९ ते ९:३० पर्यंत उशिरा सुरू झाले होते. नंतर ते सकाळी १० पर्यंत पुढे ढकलण्यात आले. शिवाय त्यांच्या आपत्ती निवारण केंद्रावरून कमोडिटी व्यवहार सुरू होणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

'तांत्रिक समस्येमुळे व्यवहार सकाळी १०:३० वाजता सुरू होतील याची सदस्यांनी नोंद घ्यावी. व्यवहार डीआर पासून सुरू होईल. गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला जात आहे' असे देशातील सर्वात मोठ्या कमोडिटी एक्सचेंजने त्यांच्या संकेतस्थळावरील निवेदनात म्हटले आहे.

चार महिन्यांत एक्सचेंजचा हा दुसरी बिघाडीआहे. मुंबई येथील मल्टी कमोडिटी एक्सचेंजची स्थापना नोव्हेंबर २००३ मध्ये झाली. एमसीएक्स हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह (Commodity) एक्सचेंज आहे. एमसीएक्सवर सकाळी १० वाजता रेडिंग पुन्हा सुरू होऊ शकले नाही आणि एक्सचेंजने सांगितले की ट्रेडिंग सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. तांत्रिक समस्येमुळे ट्रेडिंग सुरू होण्यास विलंब होत आहे. डीआर साइटवरून ट्रेडिंग सुरू होईल असे सांगण्यात येत आहे. याविषयी बोलताना एमसीएक्सने असेही म्हटले आहे की,' ट्रेडिंग सुरू होण्याची वेळ बाजारातील सहभागींना कळवली जाईल. गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला जात आहे'.

दरम्यान, एमसीएक्सने माहिती दिली आहे की कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवार ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे, ज्यामध्ये ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी कंपनीचे अन-ऑडिटेड आर्थिक निकाल (स्टँडअलोन आणि कन्सोलिडेटेड) विचारात घेतले जातील आणि मंजूर केले जातील.

तज्ञांच्या विश्लेषणानुसार, गेल्या एका वर्षात एमसीएक्सच्या शेअर्समध्ये ४०% वाढ झाली आहे. दोन आणि तीन वर्षांत, एमसीएक्सच्या शेअर्सनी अनुक्रमे ३००% आणि ५००% अधिक परतावा दिला आहे. एमसीएक्स, ज्याने त्याच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य विभाजित करण्याची घोषणा केली आहे, तो बीएसई ५०० निर्देशांकाचा एक घटक आहे. ऑगस्टमध्ये, एमसीएक्सच्या बोर्डाने ५:१ च्या प्रमाणात उपविभागासाठी प्रस्ताव मंजूर केला होता. प्रस्तावाअंतर्गत, १० रुपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेले प्रत्येक विद्यमान शेअर पाच इक्विटी शेअर्समध्ये विभागले जातील. प्रत्येकी २ रुपये, पूर्णपणे परतफेडीसह हे व्यवहार होते. शेअर्सची परवडणारी क्षमता सुधारणे आणि किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हा या निर्णयाचा उद्देश आहे असे एमसीएक्सने आपल्या कार्यवाही दरम्यान स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >