महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि तोडणीविषयी स्वतंत्र धोरण तयार केले आहे. सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी यामुळे राज्यात पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.


‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ अंतर्गत नेस्को गोरेगाव येथे महाराष्ट्राचे जहाज बांधणी धोरण या विषयी नेदरलँड, सिंगापूर यासह देशातील सागरी क्षेत्रातील उद्योजकांसोबत मंत्री राणे यांनी विविध विषयावर चर्चा केली आणि उद्योजकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचे आवाहनही मंत्री राणे यांनी केले.


मंत्री राणे म्हणाले की, महाराष्ट्र उभारण्यात येणारे प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या जलद गतीने दिल्या जात आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या बंदरांच्या विकासासाठी राज्य शासन काम करत आहे. बंदराचा विकास आणि क्षमता वाढ यासह नवीन बंदर उभारण्यावरही भर दिला जात आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ आणि तंत्रज्ञ यांची मोठी आवश्यकता राज्यात आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. तसेच या उद्योगाला लागणारे कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी आयआयटी सारख्या संस्थांसोबत करार करण्यात आले आहेत. याचा फायदा उद्योजक, नागरिक आणि राज्याच्या अर्थ व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


मंत्री राणे यांनी सांगितले की, नव्या जहाज बांधणी धोरणामुळे उद्योजकांना या क्षेत्रात गुंतवणूक करणे आणि प्रकल्प वेळेत उभारणे यासाठी शासन सर्व स्तरावर मदत करेल. यासाठी एक गट तयार करण्यात आला आहे. जहाज बांधणी उद्योग हा क्लस्टर स्वरूपात विकसित केला जाणार आहे. त्यामुळे उद्योजकांना सर्व सोयी उपलब्ध होतील. तसेच जहाज बांधणीसाठी उभारण्यात येणारी बंदरे रस्ते आणि रेल्वे मार्गाने जोडली जाणार असल्याचेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.


यावेळी उद्योजकांनी राज्यात सुरू असलेल्या विकास कामांचे कौतुक करून बंदरांच्या विकासासाठी शासन राबवत असलेल्या धोरणांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच बंदर विकास क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उत्सुकता दर्शवली.


बैठकीमध्ये नेदरलँड, सिंगापूर, अबुधाबी येथील कंपन्यांसोबतच चौगुले शिपिंग, गोवा शिपयार्ड या भारतीय कंपन्यांनी ही सहभाग घेतला.

Comments
Add Comment

आज मुंबईत पंतप्रधान मोदींची 'समुद्री व्हिजन' परिषद!

'मॅरिटाइम सीईओ फोरम'ला करणार संबोधित; १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणार मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता