पुणे : गुंड गजानन उर्फ गज्या मारणेच्या टोळीतील रुपेश मारणेला पोलिसांनी अटक केली आहे. मारणे टोळीचा म्होरक्या गजानन मारणे याच्या पाठोपाठ पोलिसांनी रुपेश मारणेलाही अटक केली आहे. दोन प्रमुख गुंड गजाआड झाल्यामुळे मारणे टोळीच्या कारवाया थंडावण्याची शक्यता वाढली आहे.
पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळी आणि घायवळ टोळी विरोधात कारवाई केली. आता मारणे टोळी विरोधातही पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. शिवजयंतीच्या दिवशी अभियंता देवेंद्र जोग यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात दीर्घकाळ फरार असलेला रुपेश मारणेला मुळशी येथून २७ ऑक्टोबर रोजी कोथरुड पोलिसांनी ताब्यात घेतले.
महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. यात लाडघर, गुहागर, ...






