चेहऱ्याची त्वचा नितळ ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!


आपल्या शरीरात जेव्हा एखादा बदल होतो, तेव्हा त्याचा परिणाम लगेच आपल्या चेहऱ्यावर दिसतो. जसे की, आपण अतिउष्ण पदार्थ खाल्ले तर चेहऱ्यावर पुरळ येण्यासारखे प्रकार होतात. मग चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण विविध प्रकारच्या क्रीमस् आणि मेकअपचा चेहऱ्यावर भडिमार करतो. मात्र क्रीमस् आणि मेकअपशिवाय चेहरा तुकतुकीत ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.



मेकअपशिवाय
चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, दररोज त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये दररोज चेहरा स्वच्छ धुणे, योग्य आहार करणे आणि निरोगी जीवनशैली राखणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे हे नैसर्गिक तेज मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.




नितळ आणि सुंदर
चेहऱ्यासाठी दररोज किमान तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास त्वचा कोरडी होते. ज्यामुळे चेहऱ्यावरील तेज कमी होते. पाण्यासोबतच योग्य आहार करणे महत्त्वाचे आहे. अती तळलेले पदार्थ, अती आंबट पदार्थ आणि खूप मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. यामुळे शरीरातील अॅसिडीटी वाढून परिणामी पुरळ येणे, त्वचा लाल होणे असे प्रकार घडतात. तर दुपारच्या जेवणात काकडी, गाजर आणि टोमॅटो सारखे सलाड नियमित खाणे गरजेचे आहे. तसेच दिवसात कमीतकमी आठ तास पूर्ण झोप घेणेसुद्धा गरजेचे आहे. यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहतेय.



सर्व प्रकारांप्रमाणेच स्वतंत्र
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी दैनंदिन जीवनात काही सवयी असणे महत्त्वाचे आहे. ज्यात कोमट किंवा थंड पाण्याने दिवसातून दोनवेळा चेहरा धुणे अनिवार्य आहे. चेहरा धुतल्यावर स्वच्छ कपड्याने मध्यम कोरडा करावा. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चराइझर लावावे. मॉइश्चराइझरमुळे चेहरा दिवसभर हाइड्रेट राहतो. मॉइश्चराइझरनंतर तिसरी पायरी म्हणजे सुर्यकिरणांपासून बचाव होण्यासाठी सनस्क्रीन लावणे. यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा नितळ राहण्यास मदत होईल.


Comments
Add Comment

सतत स्क्रीनचा वापर करून डोळे थकले असतील तर न चुकता खा हे आठ पदार्थ, चष्म्याचा नंबरही होईल आपोआप कमी

मुंबई : बदललेल्या जीवनशैलीत लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या स्क्रीनसमोर तासन्‌तास काम करणे महत्वाचे झाले आहे. याचा

बाणेरमधील आरोपीला दिल्लीतून पाच महिन्यांनंतर अटक

पुणे : बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यू प्रकरणी एकाला दिल्लीतून अटक

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग