Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार

चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार

पुढील पाच दिवसांत काही राज्यांना पावसाचा इशारा!

मुंबई : बंगालच्या खाडीत उफाळलेलं मोंथा चक्रीवादळ, अरबी समुद्रावरील खोल कमी दाबाचा पट्टा आणि उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांवर तीव्र होण्याच्या तयारीत असलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे देशाचे हवामान पूर्णपणे बदलले आहे. पुढील चार ते पाच दिवस देशाच्या मोठ्या भागात पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याच्या मते, बंगालच्या उपसागरातील हे च्रकीवादळाचे सोमवारी संध्याकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले, ज्याचा वेग ताशी ८८ किमी पर्यंत पोहोचला. तर मंगळवारपर्यंत हा वेग आणखी वाढू शकतो आणि ताशी ११० किमी वेगाने हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकू शकते. या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी फोनवरून परिस्थितीबद्दल चर्चा केली आणि सर्व शक्य केंद्रीय मदतीचे आश्वासन दिले आहे.

आंध्र प्रदेशातील काकीनाडाजवळ चक्रीवादळ मोंथा धडकण्यास सुरुवात झाली आहे. तर राजमुंद्री, विशाखापट्टणम आणि मछलीपट्टणम या किनारी जिल्ह्यांमध्ये आधीच मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे जाणवत आहेत. आंध्र प्रदेशातील सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आणि मदत पथके तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडू या पूर्व किनारपट्टी राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. तर ते उत्तरेकडे सरकत असताना, मध्य भारत आणि उत्तर भारतातील अनेक भागात हवामानात अचानक बदल जाणवणार आहे. त्याचा परिणाम छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्ली-एनसीआरमध्येही जाणवेल. हवामान खात्याने २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान या राज्यांमध्ये वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >